आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावात संतप्त जमावाच्या तावडीतून वाचलेल्या दांपत्यांची जिंतूरला रवानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- पोरधरी असल्याच्या संशयावरून रविवारी रात्री मालेगावात जमावाच्या तावडीत सापडलेल्या, पण काही सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेने वाचलेल्या परभणी जिल्ह्यातील पाच जणांसह एकूण नऊ जणांना साेमवारी त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण पाहून गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. 


रविवारी रात्री १०.३० वाजता मालेगावातील सनाउल्लानगर भागात लहान मुलांना पळवणारी टाेळी अाल्याच्या अफवेने काही नागरिकांनी ४ जणांना पकडले. यात २ महिला व २ पुरुष होते. त्यांच्याजवळ एक लहान मुलगा असल्याने नागरिकांचा संशय अधिकच बळावला. यातून पुरुषांना मारहाण करण्यात अाली. मात्र, काही सुज्ञ व्यक्तींनी त्यांना जमावाच्या तावडीतून साेडवत घरात लपवून ठेवले. घटनेची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने माेठा जमाव जमला. पाेलिसही फाैजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जमाव एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावातील काही अतिउत्साही तरुणांनी अचानक पाेलिसांवर दगडफेक सुरू केल्याने तणाव वाढला. जमावाला पांगवण्यासाठी पाेलिसांनी लाठीमार केला. जमावाने दंगा नियंत्रण पथकाची व्हॅन उलटवून एक दुचाकी नालीत फेकून नुकसान केले. माजी अामदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांच्या अावाहनासही जमाव जुमानत नसल्याने पाेलिसांनी वाढीव बंदाेबस्त मागवून पाच जणांना सुखरूप पाेलिस नियंत्रण कक्षात हलवले. हा सर्व प्रकार मध्यरात्री दाेन वाजेपर्यंत सुरू हाेता. 


कामानिमित्त गेले हाेते धुळ्याला 
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वडी येथील गजानन गिरे, सिंधुबाई गिरे, याेगेश वाणी, अनुसयाबाई वाणी, बाबासाहेब गव्हाणे, सुमनबाई गव्हाणे व विठ्ठल अामरे, जनाबाई अामरे ही चार दांपत्ये कामानिमित्त धुळ्याला गेली हाेती. त्यांच्यासाेबत असलेली मुलगी अाजारी पडल्याने हे सर्व माघारी निघाले हाेते. धुळ्याहून ट्रकमध्ये बसून ते रविवारी रात्री मालेगावी उतरले. येथून मनमाडला जाण्यासाठी पैसे नसल्याने यातील गजानन गिरे व याेगेश वाणी हे कुटुंबासह लाेकांकडे पैसे मागत हाेते. मुले पळवून नेल्याच्या अफवेमुळे हे दाेन्ही कुटुंबीय जमावाच्या तावडीत सापडले हाेते. 


कुटुंबीय मजुरी करणारे 
चारही दांपत्ये माेलमजुरी करणारी अाहेत. पाेलिसांनी जिंतूर पाेलिसांशी संपर्क साधून या कुटुंबीयांविषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्याविराेधात कुठलाही गुन्हा दाखल नाही. चाैकशीनंतर पाेलिसांनी या कुटुंबीयांना रवाना केले. मात्र, जमावाविराेधात दगडफेक, पाेलिस वाहनांचे नुकसान, अफवा पसरवणे अशा कलमांन्वये अाझादनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे. घटनेचे व्हिडिअाे चित्रीकरण, फाेटाे यांची पाहणी करून संशयितांना अटक केली जाणार अाहे. 


साेशल मीडियावर नजर 
अफवा साेशल मीडियावरून पसरवल्या जात अाहेत. याची शहानिशा केली जात नसल्याने असे प्रकार घडत अाहेत. पाेलिस साेशल मीडियावरील अफवांवर लक्ष ठेवून अाहेत. अफवा पसरवणाऱ्यांविराेधात थेट गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जाईल. 
रत्नाकर नवले, उपअधीक्षक, मालेगाव शहर 


घडवले माणुसकीचे दर्शन 
जमावाच्या तावडीत सापडलेल्या व्यक्ती भिन्न जातींच्या असल्याचे लक्षात येताच काही सुज्ञ नागरिकांनी जमावाला सामाेरे जात त्यांचा बचाव केला. रशीद राशनवाला यांनी स्वत:च्या घरात गिरे दांपत्याला मुलासह अाश्रय दिला. संतप्त नागरिकांनी राशनवालांच्या घरावर दगडफेक करून काचा फाेडल्या. अन्य एकाने वाणी दांपत्याला सायजिंग कारखान्यात लपवून ठेवले. राशनवाला व सायजिंग मालकाच्या माणुसकीमुळे ही कुटुंबे सुखरूप राहिली. 

 

बातम्या आणखी आहेत...