आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- एचएएल नाशिकला सुखाेई विमानांच्या बांधणीचे काम मिळाल्यानंतर त्याच्या सुट्या भागांची निर्मिती माेठ्या प्रमाणावर व्हेंडर नाेंदणीतून झाली. नाशिकमधील उद्याेगांच्या गुणवत्तावाढीसाठी एचएएलने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने ते या क्षेत्रात सक्षम झाले अाहेत. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब व कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकची अाेळख जागतिक पातळीवर 'विमानबांधणी उत्पादनाचे शहर' म्हणून व्हावी, अशी अपेक्षा एचएएल मिग काॅम्प्लेक्सचे सीईअाे दलजितसिंग यांनी व्यक्त केली.
अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या वतीने डाेंगरे वसतिगृह मैदानावर अायाेजित केलेल्या 'अायमा इंडेक्स २०१८' या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, 'एचएएल नाशिककडे २०१९-२० पर्यंत पुरेल इतकेच काम अाता शिल्लक असून पुढेही काम मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू अाहे. नाशिकच्या उद्याेगांना जागतिक एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवता येण्याइतपत सक्षम अाम्ही केले असून, यापुढेही करत राहू.'
अागामी केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकमध्ये रेल्वे व्हिल्स दुरुस्ती कारखान्याची घाेेषणा हाेण्याची शक्यता असल्याचे सांगून खासदार हेमंत गाेडसे म्हणाले की, उद्याेजक अाणि लाेकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम केल्यास शहराचा विकास जलदगतीने हाेताे. अामदार बाळासाहेब सानप यांनी काही संघटना उद्याेगवाढीस मारक ठरत असून एकत्रित येऊन त्यांचा मुकाबला करावा, असे नमूद करून शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून जास्तीत जास्त निधी अाणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रदर्शनाचा शुभारंभ महापाैर रंजना भानसी, अामदार सानप, अामदार सीमा हिरे यांच्या हस्ते झाला.
व्यासपीठावर खासदार गाेडसे, महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपमहापाैर प्रथमेश गिते, अायमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, अायमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे, सेक्रेटरी निखिल पांचाल, माजी अध्यक्ष एस. एस. अानंद अादी हाेते. अामदार हिरे यांनीही मार्गदर्शन केले. राजेंद्र अहिरे यांनी प्रास्ताविक करताना अाैद्याेगिक वसाहतींतील पायाभूत सुविधांवर खर्चाचे प्रमाण वाढवण्याची मागणी केली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हाेती.
कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राचा विचार व्हावा
अायमा इंडेक्सचे चेअरमन बेळे यांनी राज्यात गुंतवणुकीसाठी नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून नाशिककडे पाहिले जात असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीतही नाशिकचा समावेश झालेला अाहे. त्यामुळे देशासह विदेशी गुंतवणूकही अापल्या शहरात यावी यासाठी पायाभूत सुविधाही चांगल्या असाव्यात अशी अपेक्षा उद्याेगजगताकडून व्यक्त केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लघु व मध्यम उद्याेजकांसाठी हे प्रदर्शन लाभदायी ठरणार असल्याचे सांगत शहरात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राची गरज असून ते शहराच्या जवळ एनएमअारडीएसारख्या संस्थेकडून उभारले जावे याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही त्यांनी लाेकप्रतिनिधींकडे केली.
बायाेकंपाेस्टरचे सादरीकरण
घनकचरा व्यवस्थापनाला अाज माेठे महत्त्व प्राप्त झाले असून, नाशिकमधील मंत्राज ग्रीन रिसाेर्सेस या कंपनीकडून यावेळी मंत्राज् बायाेकंपाेस्टरचे सादरीकरण करण्यात अाले. घरगुती अाेला कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी हे उत्पादन प्रभावीपणे उपयुक्त ठरते.
अायमा इंडेक्स प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बाेलताना एचएएल मिग काॅम्प्लेक्सचे सीईअाे दलजित सिंग. व्यासपीठावर महापाैर रंजना भानसी, अामदार बाळासाहेब सानप, अामदार सीमा हिरे, 'अायमा'चे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, 'अायमा इंडेक्स'चे चेअरमन धनंजय बेळे अादी.
अाैद्याेगिक वसाहतींत २५ काेटींचे रस्ते
सातपूर व अंबड अाैद्याेगिक वसाहतीत लवकरच २५ काेटींचे रस्ते हाेणार असल्याचे महापाैर भानसी यांनी यावेळी जाहीर केले. अाैद्याेगिक वसाहतींत गटारींचा कित्येक वर्षांपासून प्रलंबित विषय मार्गी लावत असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.