आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटींची पूर्तता होत नसल्याने राज्यातील दीड लाख धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सामाजिक कार्याच्या नावाने सुरू केलेल्या तसेच ५ किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून बदल अर्ज, अाॅडिट रिपाेर्ट सादर न करणाऱ्या १ लाख ५४८ संस्थांची नाेंदणी धर्मादाय अायुक्तालयाने रद्द केली अाहे. आणखी १ लाख निष्क्रिय संस्थांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली. 


राज्यात सुमारे साडेसात लाख संस्था धर्मादाय अायुक्तांकडून नाेंदणीकृत अाहे. पारदर्शक कारभारासाठी  प्रत्येक संस्थेला वर्षाला त्यांचा ऑडिट रिपोर्ट, तसेच संस्थेच्या विश्वस्तांमध्ये बदल असेल, तर त्याचा बदल अर्ज किंवा इतर कागदपत्रे धर्मादाय कार्यालयाला सादर करणे आवश्यक आहे. पण अनेक संस्थांकडून या अटींची पूर्तता होत नसल्याने नोंदणी रद्द करण्यासंदर्भात कायद्यात बदल करण्यात आला. त्यानुसार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये  निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहीम सुरू झाली. संस्थांना महिनाभरात त्यांची बाजू मांडण्याची नोटीस पाठवण्यात येत आहे. महिन्याच्या आत धर्मादाय कार्यालयाकडे कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या संस्थाच सुरू ठेवण्यात येतील. या अनुषंगाने ऑक्टोबरपासून आतापर्यंत १ लाख ५४८ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. 

संस्थांची नाेंदणी रद्द करण्यामागची मुख्य कारणे 
- संस्थेने नाेंदणी झाल्यापासून हिशेबपत्रके दाखल केलेली नाहीत 
- चेंज रिपाेर्ट सादर केलेला नाही 
- लेखापरीक्षण अहवाल सादर न करणे 
- पदाधिकाऱ्यांची निवडणूक वेळच्या वेळी घेतली नाही 
- संस्थेत हाेणारे बदल सादर केलेले नाहीत 
- संस्था निष्क्रिय असल्याचे प्रथमदर्शनी दिसले.

बातम्या आणखी आहेत...