आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्‍ये बसतांना वृध्देची सोन्याची पोत लांबवली;सुरक्षित वाहतुक सप्तहाची असुरक्षित सुरवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- येथील बसस्थानकामध्‍ये बसमध्ये बसतांना एका वृध्द महिलेच्या गळातुन अज्ञात चोरट्याने सोन्याची पोत लांबवल्‍याची घटना बुधवारी सांयकाळी साडे पाच वाजेला घडली. आज पासुन सुरक्षीत वाहतुक सप्ताहाची सुरवात झाली आहे. सप्ताहाच्या पहिल्याचं दिवशी घडलेल्‍या चोरीच्‍या घडनेने खळबड उडाली आहे.


ठगुबाई महाजन असे वृध्‍द महिलेचे नाव असून बुधवारी सायंकाळी त्‍या दहिगाव येथे जाण्‍यासाठी बस क्रमांक एम.एच. २० डी. ८५९७ मध्‍ये बसल्‍या होत्‍या. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्‍यांची दहा हजार रुपये किंमतीची सोन्‍याची पोत लांबवली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, हवालदार रा.का.पाटील, सुशील घुगे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आगारातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्‍याची माहिती धक्‍कादायक माहिती समोर आली. जे कॅमेरे सुरू होते त्‍यातही बस उभी असलेला भाग स्‍पस्‍ट दिसत नव्‍हता. वृध्‍द महिलेने देखील कोणाला पाहिले नसल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. सुरक्षा सप्‍ताहाच्‍या पहिल्‍याच दिवशी घडलेल्‍या चोरीच्‍या घटनेने प्रवाशांमधून रोष व्‍यक्‍त होत आहे. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...