आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक आधार देणारे एवढे हतबल का? कोपर्डीतील पीडितेच्या अाईची वेदनादायी भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -   ‘आमच्या कुटुंबावर आघात झाला तेव्हा भय्यू महाराजांच्या आधारामुळेच आम्ही उभे राहू लागलो. त्यांच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे,’ अशी भावना कोपर्डीतील निर्भयाची अाई रेखा सुद्रिक यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली.  गेल्या वर्षी मुलीची बलात्कार करून हत्या झाल्यानंतर आमचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले हाेते. त्या वेळी सुद्रिक कुटुंबाला भय्यूजी महाराजांनी मोठा आधार दिल्याची आठवण रेखा यांनी सांगितली.     


कोपर्डीच्या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. त्यानंतर सुद्रिक कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण झाले होते. गावातील मुलीही शाळेत जाण्यास घाबरत होत्या. त्या वेळी भय्यूजी महाराजांच्या सूर्योदय परिवाराकडून कोपर्डीतील मुलींसाठी दोन शालेय व्हॅन देण्यात आल्या होत्या. तसेच सहा महिने सुद्रिक कुटुंबाला भय्यूजी महाराजांच्या परिवाराने किराणा भरून देण्यापासून इंदूरमधील त्यांच्या आश्रमात मन:शांती शिबिरात उपचारही केले होते. कोपर्डी घटनेस एक वर्ष उलटल्यावर निर्भयाचे स्मारक बांधण्यातही त्यांचा पुढाकार होता.

 

भय्यूजींच्या निधनाने देशाची हानी : हजारे

सामाजिक व आध्यात्मिक व राष्ट्रीय  दृष्टिकोन असणाऱ्या भय्यूजी महाराज यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भय्यूजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली.   हजारे म्हणाले, भय्यूजी महाराज यांनी नेहमी सामाजिक दृष्टिकोन ठेवून राष्ट्राची सेवा करण्याचे काम केले.

 

हजारे-महाराजांचे गुरू-शिष्याचे नाते

अण्णा हजारे व भय्यूजी महाराज यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते. महाराज नेहमी अण्णांकडून सामाजिक कामांबाबत मार्गदर्शन घेत. त्यांनी अण्णांना सामाजिक गुरू मानले होते. अनेक राज्यांत जलसंधारणाची कामे केली. पारनेरला येत तेव्हा राळेगणसिद्धीला येऊन अण्णांच्या प्रकृतीची चौकशी करत.

 

बातम्या आणखी आहेत...