आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदूरमध्यमेश्वरमध्ये वाढला पर्यटक पक्ष्यांचा मुक्काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्ह्यात झालेला मुबलक पावसामुळे धरण क्षेत्रात पाणी मुबलक प्रमाणात असल्याने तसेच खाद्यही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने यंदा प्रथमच नांदूरमध्यमेश्वर येथे पक्ष्यांनी मुक्काम वाढविला अाहे. उन्हाळ्याच्या काळात एरवी पक्षी परतीच्या वाटेला लागतात. परंतु सध्या दहा हजारपेक्षा अधिक पक्षी परिसरात असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात येते. 


भरतपूर अशी अाेळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पाणथळावर पक्ष्यांचे अागमन अाॅगस्ट महिन्यापासूनच सुरू झाले. विस्तीर्ण जलाशय आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी यांचे संमेलन नांदूरमध्यमेश्वरमध्ये भरलेले दिसून अाले. यंदा जलाशयातील उथळ पाणी, विपुल जलचर, विविध पाणवनस्पती, किनाऱ्यालगतच्या परिसरात वृक्षराई, सभोवतालच्या शेतातील हिरवीगार पिके या परिस्थितीने नांदूरमध्यमेश्वर हे पक्ष्यांचे अधिवासाचे ठिकाण बनण्यास पाेषक ठरले. दिवाळीच्या काळात पक्ष्यांची संख्या चक्क २२ हजारांवर जाऊन पाेहाेचली हाेती. गेल्यावर्षी थंडी उशीरा पडल्याने ७ हजार ६३५ इतकेच पक्षी नांदूरमध्यमेश्वरच्या भेटीला अाले हाेते. यंदा मात्र ही संख्या तिपटीने वाढली.  हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतरही नांदूरमध्यमेश्वरमध्ये पक्षी मुबलक प्रमाणात दिसत अाहे. बहुसंख्य पक्ष्यांनी अापला मुक्काम यंदा वाढवून घेतला अाहे.

बातम्या आणखी आहेत...