आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढेंकडून कुंभमेळ्याचे पुन्हा ऑडिट करण्याचे आदेश; जुनी फाईल उघडणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिका आयुक्त तुकारम मुंढे यांनी जुन्या फाईल उघडण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या खर्चाचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

 


कुंभमेळ्याच्या काळात झालेला खर्च आणि साहित्य खरेदी आवश्यक होती की अनावश्यक होती, याची चौकशी केली जाणार आहे. कुंभमेळा काळात शेकडो कोटी रुपयांचा खर्च झाल्याने त्याची तपशीलवार माहिती आयुक्तांनी मागितली आहे. नुकत्याच चार अधिकाऱ्यांना नोटीस आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिकेत अधिकारी कर्मचारी आधीच चिंतेत असताना, कुंभमेळ्याचा जुना विषय आयुक्तांनी काढल्याने संबंधित अधिकारी मुंढेंच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 


 

बातम्या आणखी आहेत...