आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे हेच विक्रेते, फेरीवाल्यांसह भाजपचेही लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेऊन महिनाही पूर्ण केलेला नाही. मुंढे हे आता सत्ताधारी भाजपसह रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, सफाई कामगार यांचे लक्ष्य झाले आहे. दोन दिवसात महापालिकेत आणि महापालिकेबाहेर घडलेल्या घडामोडींवरून हे दिसून येत आहे.

 


मालमत्ता करात भाडेमूल्याच्या आधारे 33 ते 82 टक्क्यांपर्यंत करवाढीचा प्रस्ताव आयुक्त मुंढे यांनी महासभेत ठेवला होता. या प्रस्तावास सर्वच स्तरांतून विरोध झाला. भाजप नगरसेवकांमध्ये याबाबत असंतोष होता. या असंतोषाची दखल घेत भाजपने मुंढेंचा प्रस्ताव फेटाळून लावला. स्थायी समितीच्या सरसकट 18 टक्के भाडेमूल्यावर आधारित करवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंढेंना सत्ताधारी भाजपने दिलेली ही चपराक असल्याचे मानले जात आहे.

 

 

दुसरीकडे मुंढे आल्यापासून पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग कार्यप्रवण झाला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात रस्त्यावरील विक्रेते, टपऱ्या, फेरीवाले यांसह दुकानांचे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त करण्यात येत आहे. त्यासाठी शहर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचे कारण पुढे केले जात आहे. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून रस्त्यांवर निर्धोकपणे पथाऱ्या मांडणारे, हातगाडय़ा लावणारे आणि रस्त्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पालिकेची ही कारवाई म्हणजे आपल्या पोटावरच पाय असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने शनिवारी पालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येऊन ‘मुंढे गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्या. राजकीय आशीर्वादाने रस्त्यावर ऐसपैस व्यवसाय थाटणाऱ्यांना मुंढे यांच्या मोहिमेमुळे हादरा बसला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...