आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच वर्षाच्या बालकाने गिळले 5 रुपयांचे नाणे; थोडक्यात बचावला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या अडीच वर्षांच्या मुलावर  लँरिंगोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यास जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. अन्न आणि श्वासनलिकेत अडकलेले नाणे काढण्यास खासगी रुग्णालयाने नकार दिला होता. अखेरचा पर्याय म्हणून मुलास सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते. कान-नाक-घसातज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञांच्या पथकाने अर्ध्या तासाच्या शस्त्रक्रियेद्वारे मुलास जीवनदान दिले.   


वय वर्षे अवघी अडीच वर्षे  असलेल्या साई डगळेने  (सिन्नर) घरात खेळताना पाच रुपयांचे नाणे गिळले. नाणे  अन्न आणि श्वासनलिकेच्या मध्यभागी अडकल्याने त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली.  दुपारी ३ वाजता अत्यवस्थ अवस्थेत त्यास सिन्नरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. एक्स-रेद्वारे नाण्याची जागा पाहिल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियास लाखोंचा खर्च सांगत मुलगा वाचेल की नाही याबाबत साशंकता दर्शवली. 

 

पैसे नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून  त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. एक्स-रे बघून कान-नाक-घसातज्ज्ञ संजय गांगुर्डे यांनी लँरिंगोस्कोपी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. शेळके यांच्या मदतीने भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार,  डॉ. भूषण वडनेरे  आणि शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी यांच्या टीमने अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

 

जोखीम अधिक   
अडीच वर्षीय साईचे वय अडीच आणि वजन अवघे दहा किलो होते. नाणे श्वासनलिकेत अडकल्याने तो अत्यवस्थ झाला होता. पाच रुपयांचे नाणे जाड असल्याने श्वास घेण्यास अडचण होती. अशा वेळी पूर्ण भूल देणे जोखमीचे होती.  अशा प्रतिकूल परिस्थितीत पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.


डॉ. सचिन पवार, भूलतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

 

बातम्या आणखी आहेत...