आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लढा नाशिककरांचा\' झेंड्याखाली हाेणार करवाढीविराेधात एकजूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडकोत सावतानगर येथे मनसेतर्फे घरपट्टीवाढीच्या फलकाचे दहन करण्यात अाले. - Divya Marathi
सिडकोत सावतानगर येथे मनसेतर्फे घरपट्टीवाढीच्या फलकाचे दहन करण्यात अाले.

नाशिक- महापालिकेच्या इतिहासात प्रथमच निवासी क्षेत्रासाठी ३३ टक्के करवाढ झाल्यानंतर तसेच उद्याेग व वाणिज्य क्षेत्राला बुरे दिन येत असल्याचे बघून सत्ताधारी भाजपला करवाढीपासून परावृत्त करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी 'लढा नाशिककरांचा' झेंड्याखाली सर्वांची जमवाजमव सुरू केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक बैठकीत या लढ्यात नाशिकमधील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी रविवारपासून प्रत्यक्ष विविध संघटनांच्या प्रमुखांच्या भेटीही घेतल्या जाणार असल्याचे महापालिकेतील विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी सांगितले. 


मंगळवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने स्थायी समितीकडून १८ टक्के करवाढीचा प्रस्ताव अाला असताना जादा विषयातील अायुक्तांचा ३३ टक्के निवासी क्षेत्र, वाणिज्य ६४ तर उद्याेगांसाठी ८२ टक्के करवाढीला हिरवा कंदील दाखवला. अाधीच महागाईने पिचलेल्या नाशिककरांवर हा माेठा अन्याय ठरेल, अशी भीती व्यक्त करीत करवाढीची तीव्रता कमी करण्यासाठी विराेधी पक्षांनी अाटापिटा केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी काेणाचेही न एेकता करवाढ केल्यामुळे विराेधकांनी सभात्याग करीत जनअांदाेलन उभारण्याचा इशारा दिला हाेता. करवाढीच्या निर्णयाबाबत नाशिककरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यावर अाता विराेधकांचे मनाेबल वाढले अाहे. शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेने महापाैरांच्या 'रामायण' निवासस्थानी घरपट्टी देयकांची हाेळी केली हाेती. त्यानंतर राष्ट्रवादीने विभागीय कार्यालयस्तरावर अांदाेलने सुरू केली अाहेत. पाठाेपाठ काँग्रेसने महापालिकेसमाेर धरणे अांदाेलनही केले. मनसेनेही शनिवारी सहाही विभागांत धरणे अांदाेलने केली. 


मनसेकडून विभागनिहाय हल्लाबाेल 
करवाढीविराेधात मनसेने विभागनिहाय अांदाेलन सुरू केले असून, पंचवटी कारंजा येथे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले व महानगरप्रमुख अनिल मटाले याच्या उपस्थितीत अांदाेलन करण्यात अाले. यावेळी घरपट्टीच्या बिलांची होळी करण्यात आली. पंचवटी विभागाचे अनंता सूर्यवंशी, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, खंडू बोडके, सागर जाधव, हरिष गुप्ता, जालिंदर शिंदे, राहुल राजपुरोहित, गणेश मंडलिक, प्रवीण भाटे, महिला पदाधिकारी पूजा धुमाळ, अरुणा पाटील, धनश्री, छाया नाडे, कामिनी दोंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. 

बातम्या आणखी आहेत...