आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- या अगाेदरबंॅकेत झाले तसे गैरप्रकार केदा अाहेर यांच्या कारकिर्दीत हाेता कामा नये. दर महिन्यात काेणते निर्णय घेतले गेले, त्याची सगळी माहिती सर्व संचालकांपर्यंत पाेहाेचली पाहिजे. नाहीतर मागील काळात झालेल्या गैरप्रकारांमुळे लागलेल्या चाैकश्यांना अाता अाम्हाला सगळ्यांनाच सामाेरे जावे लागणार अाहे. नाहीतर खाऊन जाते काेणी तरी अन् फेडण्याची वेळ अाम्हा सगळ्यांवर येते. त्यामुळे शिस्तप्रिय वातावरण बंॅकेत असायला हवे, असे परखड बाेल अामदार जिवा पांडू गावित यांनी जिल्हा बंॅकेत अध्यक्ष निवडीनंतर सुनावले.
जिल्हा बंॅक अध्यक्षपदाच्या निवडीनंतर संचालकांनी अापली मते व्यक्त करीत नूतन अध्यक्ष केदा अाहेर यांना शुभेच्छा दिल्या. त्यात, ज्येष्ठ संचालक गणपत पाटील यांनी जिल्हा बंॅक अडचणीत नाही. मात्र, पत्रकारांनाच बंॅकेबद्दल जास्त काळजी असल्याचे सांगत बंॅकेबद्दल प्रसारमाध्यमांतून काही चुकीच्या बातम्या येत असल्याचे मत अप्रत्यक्षपणे व्यक्त केले. त्यांच्या या मताच्या विरुद्ध अनेक संचालकांनी मत मांडले. गावित यांनी मांडलेले मत हे पाटील यांच्या अगदी विराेधात हाेते. असेच मत अनेक संचालकांचेही असल्याचे बघायला मिळाले.
बंॅक अडचणीत असण्यास अनेक कारणे असून शासनाकडून असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा अाणि निसर्गाची साथ मिळाल्याने कर्जाची परतफेड करण्यास शेतकऱ्यांना अडचणी अाल्या. अाता निसर्ग चांगला अाहे. बाजारभावही चांगले राहिले तर बंॅक सुस्थितीत येईल. नव्या अध्यक्षांनी वसुलीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे अामदार अनिल कदम यांनी सांगितले. अामदार सीमा हिरे यांनी बंॅकेसमाेर अनेक अडचणी असून लाेकांच्या त्यांच्याच पैशांसाठी जेव्हा अाम्हाला फाेन येतात, तेव्हा बंॅक सुस्थितीत अाहे, असे म्हणता येत नाही. अाता बंॅकेची स्थिती सुधारण्यासाठी सर्व संचालकांची जबाबदारी असून लाेकप्रतिनिधी या नात्याने अाम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे अाश्वस्त केले.
बंॅकेची वसुली वाढली पाहिजे यावर शिरीष काेतवाल यांनी भर दिला. परवेज काेकणी यांनी जिल्हा बंॅक अडचणीत अाल्याने अाजपर्यंत जिल्ह्यात रब्बी अाणि खरिप हंगामाकरिता केवळ टक्के कर्जवितरण झाल्याकडे लक्ष वेधले.
पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार एकमताने निवड
सकाळी११ वाजेपर्यंत काेणाच्याही नावावर एकमत झालेले नव्हते. पालकमंत्री गिरीश महाजन यांचा मला दूरध्वनी अाला. केदा अाहेर यांना संधी दिली जावी, असे सांगितले. हा निर्णय सर्व संचालकांना मी सांगितल्यावर एकमत झाले. अाजची बंॅकेची स्थिती पाहता शासनाच्या मदतीची गरज अाहे. त्याचबराेबर ठेवीदार अाणि कर्जदारांचा मेळावा तत्काळ घेऊन विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज अाहे. राजकारण नंतर पण संस्था अगाेदर जगली पाहिजे या हेतूने सगळेच अाहेर यांच्या पाठीशी राहणार अाहाेत, असे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या अॅड. माणिकराव काेकाटे यांनी सांगितले.
सर्वसंमतीने काम करणार
बंॅकअडचणीत अाहे ही परिस्थिती हाताळण्यासाठीचा अनुभव असलेले अनेक सहकारी संचालक मंडळात अाहेत. त्यांच्या सगळ्यांच्या सल्ल्यानेच अापण काम करणार अाहाेत. कर्मचारी, ठेवीदार या सर्वच संबंधित घटकांना साेबत घेऊन काम करणार असून बंॅकेचे गतवैभव परत येण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न करणार असल्याचे अाश्वासन यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष केदा अाहेर यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.