आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - सरत्या वर्षाला निराेप देत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली असतानाच शहरात गुन्हेगारी घटना घडू नयेत, मद्य प्राशन करून वाहन चालवून अपघाताच्या घटना राेखण्यासाठी पाेलिस यंत्रणाही सज्ज झाली अाहे.
रविवारी (दि. ३१) दुपारपासूनच शहरातील प्रमुख चाैक, महामार्ग, काॅलेजराेड, गंगापूरराेड, महात्मानगरसह ४० ठिकाणी नाकाबंदी करीत पाेलिस रस्त्यावर उतरणार अाहेत. अल्काेमीटर, ब्रेथअॅनलायझरद्वारे ठिकठिकाणी तपासणी करणार असून या दिवशी चायनीज, अंडाभुर्जीसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांनाही बंदी असणार अाहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यंदा रात्री उशिरा आणि पहाटे पाचपर्यंत मद्य विक्रीस परवानगी असल्याने पाेलिस यंत्रणेवर ताण दिल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, हेल्मेट आणि सीटबेल्ट नसलेल्या वाहनचालकांवर पोलिसांची नजर असणार आहे. शहरातील मोठे हॉटेल, लॉन्स, फार्म हाऊस आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. विनापरवानगी पार्टी आयोजकांवर कारवाई केली जाणार आहे. मोकळ्या जागेत वाद्य वाजवण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत मर्यादित डिसेबल परवानगी राहणार आहे. मद्य प्राशन करून वेगाने वाहने हाकणाऱ्या, विना हेल्मेट, सीटबेल्ट वापरणाऱ्या वाहन चालवणाऱ्यांवर मात्र ‘खाकी’चा दंडुक्यासह दुप्पट दंडाची आकारणी करण्यात येणार अाहे. एवढेच नव्हे ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची तपासणी माेहिमेत मद्यपी चालक अाढळल्यास त्यांचा मुक्काम पाेलिस ठाण्यातच ठाेकावा लागणार अाहे. उपआयुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, सचिन गोरे, मोहन ठाकूर, अजय देवरे, अशोक नखाते, भागवत सोनवणे, यांच्यासह १३ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत.
वाहनचालकांनी सतर्कता बाळगावी
नवीन वर्षाचे स्वागतासाठी वाहनचालक, तरुणांनी सतर्कता बाळगावी. मद्य प्राशन करून वेगाने वाहने चालवू नये, नववर्ष स्वागाच्या उत्साहाच्या वातावरणावर विरजण पडू नये, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अनुचित प्रकार घडल्यास पाेलिसांशी तत्काळ संपर्क साधावा.
- लक्ष्मीकांत पाटील, पाेलिस उपआयुक्त
या ठिकारी हाेणार तपासणी
रविवारी दुपारी १२ वाजेपासूनच शहरातील ११७ पॉइंटवर पोलिसांचे चेकिंग पॉइंट राहणार आहेत. विशेषत: महामार्ग, प्रमुख चौक, रस्त्यांचा समावेश अााहे.
हे आहेत टार्गेट पॉइंट - जेहान सर्कल, कॉलेजरोड, नांदूरनाका, हॉटेल जत्रा, म्हसरूळ, राऊ चौक, द्वारका, काठे गल्ली, आसाराम पूल, पपया नर्सरी, गरवारे, पिंपळगाव बहुला, एक्सलो पॉइंट आदी पॉइंटवर तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.