आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तासात तीन खुनांच्या घटनांनी हादरले नाशिक; नऊ संशयित ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजीवनगर येथे खून झालेल्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेताना पाेलिस. - Divya Marathi
राजीवनगर येथे खून झालेल्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेताना पाेलिस.

नाशिक- तब्बल तीन खुनांच्या घटनांनी बुधवारी नाशिक शहर हादरले. तपासाअंती यातील दोन खून किरकोळ वादातून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या दाेन प्रकरणांत नऊ संशयितांना रात्रीच ताब्यात घेण्यात अाल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.


डीजीपीनगर, अंबड येेथे रिक्षाचालक साहेबराब जाधव याचा खून झाला. याप्रकरणी चार रिक्षाचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रिक्षा थांब्यावर नंबरच्या वादातून दोन महिन्यांपूर्वी जाधवने संशयितांना मारहाण केली होती. या वादातून चार ते पाच रिक्षाचालकांनी फावड्याचे दांडे आणि चाकूने वार करून जाधवचा खून केला.  दुसरीकडे, राजीवनगरला शंभर फुटी रोडवर दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत माहिती मिळताच बुधवारी रात्री शहरात बंदाेबस्त वाढविण्यात अाला हाेता.  एक तासाच्या अंतराने तीन मृतदेह रुग्णालयात अाणले हाेते.

 

स्ट्रीट क्राइम रोखण्यास पोलिसांना अपयश   
शहरात रस्त्यावर घडणारे गुन्हे रोखण्यास पोलिसांना अपयश येत आहे. टवाळखोर, बेशिस्त रिक्षाचालक आणि स्वयंघोषित गल्लीतील नेत्यांवर वचक ठेवण्यास पोलिस यंत्रणेला अपयश येत असल्याचे घडलेल्या गंभीर घटनांतून निदर्शनास येत आहे. परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी, प्राणघातक हल्ल्यांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...