आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्ष स्वागतानिमित्त रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री, आजपासून गस्त पथक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाताळ आणि नववर्ष स्वागतानिमित्त ३१ डिसेंबर राेजी रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री करण्यास अधिकृत परवानगी मिळाली अाहे. यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रविवार (दि. २४) पासून पोलिस बंदोबस्तात बदल करण्यात अाला अाहे. यानुसार रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे गस्त पथक तैनात राहणार आहे. पोलिस ठाणेनिहाय गस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे रविवार (दि. २४), सोमवार (दि. २५) आणि रविवार (दि. ३१) या तीन दिवशी मद्यविक्री दुकाने, बिअरबार, परमिट रुम आणि देशी दारुचे दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिस ठाणेनिहाय विशेष गस्त पथक तयार करण्यात आले आहे. कारवाईसाठी ब्रेथ अॅनालायझर मशिनचा वापर करण्यात येणार अाहे. याद्वारे शरीरात किती टक्के अल्कोहोल आहे हे कळणार असून त्या प्रमाणानुसार संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. विशेष ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह उर्वरित.पान 


या मार्गावर होणार तपासणी 
महामार्ग, औरंगाबादरोड, पुणे रोड, त्र्यंबकरोड, गंगापुररोड, कॉलेजरोड, पेठरोड, दिंडोरीरोड आणि शहरातील सर्व चौक, आणि प्रमुख रस्त्यांवर ही कारवाई सुरू राहणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...