आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक विधानपरिषदेसाठी १०० टक्के मतदान, २४ ला निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी १०० टक्के मतदान झाले. ६४४ पैकी ६४४ मतदारांनी मतदान केल्याने नेमके पारडे कुणाच्या बाजूने झुकेल याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता २४ मे रोजी होणाऱ्या निकालाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


सकाळी ८ पासून मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीला संथ असलेली मतदानाची टक्केवारी १० ते २ दरम्यान वेगाने वाढली. त्र्यंबकेश्वर, येवला आणि नांदगावमध्ये दाेन वाजेनंतर मतदान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रात पहिल्या दोन तासांत १६० पैकी ४ मतदारांनी मतदान केले. सकाळी १० नंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून रात्रीपासून निगराणीवर असलेल्या मतदारांना थेट मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच बसद्वारे आणून सोडण्यात आले. सकाळी १० पर्यत संपूर्ण जिल्ह्यात मिळून ६.२१ टक्के झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत १० वाजेनंतर वेगाने वाढ झाली. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे आपल्या पक्षातील मतदारांना घेऊन दाखल झाले तेव्हा पूर्वाश्रमीचे सहकारी व आता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार असलेले शिवाजी सहाणे यांनी आपले दोन्ही हात जोडून त्यांना असा 'जय महाराष्ट्र' केला. तेव्हा शिवसैनिकांचे चेहरे हास्याने फुलून गेले.