आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावला येथे जुगार अड्डयावर धाड; लाखोंच्‍या मुद्देमालासहित 18 जुगारींना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- शहरातील चोपडा रस्त्यावर एका जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकत तब्ब्ल १८ जुगारींना ताब्यात घेतले आहे तर जुगार साहित्या सह सुमारे लाखों रुपयाचा रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली. भुसावळ विभागीय सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्‍यासोबत पथकाने सदरील कारवाई केली आहे. या कारवाई मुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 


शहरातील चोपडा रस्त्या लगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर सिद्दीक अली युसुफ अली यांच्या कडे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती भुसावळ विभागीय सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल यांना मिळाली होती. माहिती नुसार शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या दरम्‍यान सापळा लावुन जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकण्‍यात आला. यावेळी १८ जणांना ताब्यात घेतले तर जुगाराच्‍या साहित्यासह रोख रक्कम, एक दुचाकी व मोबाईल असा सुमारे लाखाच्या वर रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाई मुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा पर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...