आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाईने चाॅकलेटसाठी दिलेले 10 रुपयांचे नाणे गिळल्याने मुलीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आईने चाॅकलेट आणण्यासाठी दिलेले १० रुपयाचे नाणे ४ वर्षीय बालिकेने खेळता खेळता ताेंडात टाकत गिळून टाकले. तिला पोटात असह्य वेदना झाल्या. १ दिवस ३ रुग्णालयांत उपचार करूनही तिचा सोमवारी मृत्यू झाला. चांदगिरी येथील शालिनी दत्तात्रय हांडगे या बालिकेने शनिवारी नाणे गिळल्यानंतर वडिलांनी शनिवारी तिला बिटकाे, नंतर जिल्हा रुग्णालय व नंतर मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल केले हाेते. 

 

रुग्णालयात डॉक्टरच नव्हते

रविवारी सकाळी अकरा-साडेअकरा वाजता ही घटना घडली आहे. ही चिमुकली रडत असल्याने तिच्या घरच्यांनी तिच्या हातात 10 रुपयाचा कॉईन दिला. या मुलीने तो 10 रुपयाचा कॉईन गिळला. सुरुवातीला हे घरच्याच्या लक्षात आले नाही. त्यानंतर शालिनी झोपी गेली.  मात्र, अचानक त्रास होऊ लागल्याने तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिने नाणे गिळल्याचे समोर आले. श्वासनलिकेच्या टोकावर हा कॉईन अडकला होता. तिला नाशिक महापालिकेच्या बिडको रुग्णालयात नेण्यात आले पण रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने उपचार होऊ शकले नाही. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे उपचार होऊ शकले नाहीत नंतर तिला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आणि तिच्यावर उपचार करण्यात आले. पण अखेरपर्यंत कॉईन न निघाल्याने अखेर 12 तासानंतर या चिमुकलीचा मृत्यू झाला. वेळीच उपचार मिळाल्यास या चिमुकलीचे प्राण वाचू शकले असते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

 

 

 

बातम्या आणखी आहेत...