आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवल्यातील 41 टंचाईग्रस्त गावांचा पाणीप्रश्न सुटणार; मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- तालुक्यातील ४१ टंचाईग्रस्त गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना टप्पा मध्ये समावेश करण्याचे आश्वासन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी जयवंत जाधव यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान गुरुवारी (दि.१४) विधान परिषदेत दिले. 


तारांकित प्रश्नावर बोलताना आमदार जाधव यांनी राजापूरसह ४१ टंचाईग्रस्त गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याकरिता सातत्याने मागणी होत आहे. यासाठी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, नाशिक यांनी शासनास पूर्वव्यवहार्यता अहवाल सादर केला आहे. ही योजना तयार करण्यासाठी नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कॅनॉल मधून पिण्यासाठी पाणी आरक्षित करून ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर साठवण तलावाद्वारे नवीन योजना तयार करण्याचे प्रस्तावित आहे. 

 

तालुक्यातील ४१ गावांना शाश्वत पाणी योजना नसल्यामुळे टंचाई काळात दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरिता ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच या योजनांचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी केली. 


त्यावर येवला तालुक्यातील राजापूरसह ४१ टंचाईग्रस्त गावांसाठी प्रस्तावित असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा मध्ये समावेश केला जाईल असे आश्वासन पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. 


या गावांना होणार लाभ 
राजापूर,ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी,राहाडी, पिंपळखुंटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडप सावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहित, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, कोळम बुद्रुक, कोळगाव, कुसमाडी, नायगव्हाण, तळवाडे, खिर्डीसाठे, महालगाव, घना माळी मळा (नगरसूल), गणेशपूर, कासरखेडे, दुगलगाव, बोकटे आदी ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांना शाश्वत पाणीपुरवठा योजना मिळणार अाहे. त्यामुळे त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...