आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी, 247 कोटी जिल्हा बँकेत जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बहुप्रतीक्षित कर्जमाफीच्या याद्या बॅँकांना प्राप्त व्हायला सुरूवात झाली असून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला अशाच ७५ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली असून ते तपासण्याचे काम गेले दाेन दिवस सर्वच २१३ शाखांत अहाेरात्र सुरू हाेते. या नव्या यादीपाेटी २४७ काेटी रूपये बँकेच्या सेंट्रल अकाऊंटला सरकारने जमा केले असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली. 


दरम्यान, विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन अाजपासून सुरू हाेत असून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा त्यात गाजणार अशी चिन्हे दिसायला लागली अाहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी कर्जदार असलेल्या जिल्हा बँकेतील १ लाख ३८ शेतकऱ्यांना सरकारच्याकर्जमाफी याेजनेचा लाभ मिळणे अपेक्षित अाहे. त्यापैकी अात्तापर्यंत ८४ हजार ८३ शेतकऱ्यांची यादी बँकेला पात्र लाभार्थी म्हणून मिळालेली अाहे. अजुनही जवळपास ५३ हजार शेतकऱ्यांची नावे प्रतिक्षेत अाहेत. कर्जमाफी मिळण्यासाठी अायटी विभागातील त्रुटींचे कारण समाेर अाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बंॅक अाणि सरकारच्या अायटी विभागाला त्रुटी दूर करण्याचे अादेश दिले हाेते. 


यानंतर संबंधित बंॅका अाणि सरकारी यंत्रणा रात्रंदिवस यासंदर्भात काम करत अाहेत. जिल्हा बँकेतही याचप्रकारचे काम सुरू असल्याचे चित्र सातत्याने पहायला मिळत हाेते. तरीही केवळ ९०८३ शेतकऱ्यांचीच नावे अाणि त्यापाेटी ५३ काेटी रूपयेच यापूर्वी बँकेत वर्ग झाल्याचे कारण देत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिला हाेता. विशेष म्हणजे नव्या अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर हाेण्यापूर्वीच ७५ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेला सरकारने पाठविली अाहे. त्यामुळे बँकेचे दैनंदिन अार्थिक कामकाज येत्या काही दिवसात सुरळीत हाेण्याची चिन्हे अाहेत. 


सुटीच्या दिवशीही काम सुरू 
सरकारच्याअादेशानंतर शनिवार अाणि सुटीचा दिवस असलेल्या रविवारीही जिल्हा बँकेत कर्मचारी काम करीत हाेते. कर्जमाफीच्या यादीतील शेतकऱ्यांची माहिती कर्जखात्याची रक्कम यासारख्या बाबी पडताळून पाहिल्या जात हाेत्या. येत्या दाेन दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जखाती अनुदानाची रक्कम जमा हाेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...