आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील १६६ अनधिकृत लाॅन्सवर साेमवारपासून टप्प्याटप्प्याने हाताेडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नगररचनाबराेबरच वाहतूक नियम पायदळी तुडवत शहरातील १६६ हून अधिक अनधिकृत लॉन्स व मंगल कार्यालयांवर साेमवारपासून (दि. २१) हाताेडा पाडण्याची कारवाई सुरू केली जाणार अाहे. नगररचना विभागाने त्यादृष्टीने अतिक्रमण निर्मूलन विभागाशी चर्चा करून तयारी सुरू केल्याने लाॅन्सचालकांचे धाबे दणाणले अाहे. 


शहरात गेल्या काही वर्षांत दिमाखदार विवाह साेहळे साजरे करण्याचे एक फॅडच अाले. जणू काही प्रतिष्ठेचा विषय झाल्यामुळे स्वाभाविकच मागणीप्रमाणे पुरवठा यानुसार औरंगाबादरोड, पाथर्डी, इंदिरानगर, गंगापूररोड, पंचवटीत माेठ्या प्रमाणात लाॅन्स, भली-माेठी मंगल कार्यालये थाटली गेली. शहरात हिरव्या पट्ट्यातून माेठ्या प्रमाणात पिवळ्या पट्ट्यात शेतजमिनी अाल्यामुळे येथे भले माेठे डाेम उभारून विवाहसाेहळ्यासाठी लाॅन्सचा वापर सुरू झाला. मात्र, शेतीक्षेत्रावरील जागेचा व्यावसायिक वापर करताना तसेच येथे बांधकाम करताना नगररचना विभागाची परवानगीच घेतली नाही. शिवाय, पार्किंगसाठी जागाच न साेडल्यामुळे रस्त्यावर वाहतूक काेंडी हाेऊ लागली. दरम्यान, अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील किती लाॅन्स व मंगल कार्यालये अधिकृत अाहेत याचे सर्वेक्षण करण्यास सांगितले. त्यानुसार नगररचना विभागाच्या पाहणीत १६६ लॉन्स आढळून आले अाहेत. या सर्वांवर साेमवारपासून कारवाई सुरू हाेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 


३१ मेपूर्वीच्या कारवाईमुळे संभ्रम 
राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे धोरण अमलात आणले असून त्याची मुदत ३१ मे ही अाहे. या धाेरणात लाॅन्सचालकांना अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची संधी अाहे. मात्र, नियमितीकरणासाठी गेल्यास ४० ते ५० लाखांपर्यंत खर्च जात असल्यामुळे अनेकांनी जमवाजमव सुरू केली अाहे. दरम्यान, या धाेरणानुसार ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी संधी अाहे. प्रत्यक्षात, महापालिकेने त्या मुदतीचा विचार न करता कारवाईचा इशारा दिल्यामुळे विराेध वाढण्याची शक्यता अाहे. 

बातम्या आणखी आहेत...