आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीईच्या 6 हजार 589 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू; 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शैक्षणिक वर्ष २०१८ व २०१९ साठी शिक्षणहक्क अंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी शनिवारपासून (दि. १०) ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी पाचशे अर्ज अाले अाहेत. पालकांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील. आरटीईच्या शहर व जिल्ह्यातील ४६६ शाळांतील ६५८९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. 


शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून नाशिक शहरात ९८ शाळांमध्ये दोन हजारांहून अधिक जागा आहेत. जिल्ह्यातील ४६६ शाळांमध्ये सहा हजारांहून अधिक प्रवेशाच्या जागा आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०१८ व २०१९ या वर्षासाठी २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे.

 

हे महत्त्वाचे बदल 
एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दहा शाळांसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्याची फक्त एकाच शाळेत लॉटरी लागेल. लॉटरीनंतर दिलेल्या मुदतीत प्रवेश घेतला नाही तर पुढील फेऱ्यांतून प्रवेश मिळणार नाही. जे विद्यार्थी २०१७ व २०१८ मध्ये पहिलीमध्ये शिक्षण घेत आहे, ते पुढील वर्ष २०१८ व २०१९ मध्ये पहिलीत प्रवेश घेण्यास पात्र राहणार नाहीत. नर्सरीसाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत तीन वर्षे पूर्ण तर पहिलीसाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ५ वर्षे ८ महिने पूर्ण असणे आवश्यक आहेत. पालकांनी शाळेचे माध्यम, प्रवेशस्तर, सुविधा बघूनच शाळेची निवड करावी. आरटीई प्रवेशासाठी एससी व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाची अट नसून त्यांना जातीचा दाखला आवश्यक आहे. इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना २०१६ व २०१७ या वर्षाचा एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला आवश्यक आहे. 

बातम्या आणखी आहेत...