आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- जातीयदृष्ट्या संवेदनशील खटल्यांचा निकाल कुणाच्या तरी विराेधात लागणार असतोच. त्यामुळे प्रचंड मानसिक ताण येतो. म्हणून यापुढे जातीय रंग असलेले खटले स्वीकारायचे नाहीत, असा निर्णय आपण घेतल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.
खटल्यातील मोठे आव्हान कोणते होते?
अॅड. निकम : प्रचंड मानसिक तणाव. दुर्दैवाने आपल्याकडे कोणतीही घटना घडली की त्यातील फौजदारी बाबींपेक्षा आरोपी आणि फिर्यादी कोणत्या जातीचे आहेत याचा गवगवा अधिक होतो आणि याचा खटला चालवताना प्रचंड तणाव येतो. खटल्याचा निकाल कोणत्या तरी एका गटाच्या विरोधात लागणारा असतो हे वास्तव आहे. त्यामुळे भविष्यात जातीय रंग असलेले खटले स्वीकारायचे नाहीत असे ठरवले आहे.
पण हा खूप मोठा निर्णय होईल..
अॅड. निकम : अर्थातच. खैरलांजी हत्याकांडात भंडारा कोर्टात मी आरोपींना फाशी मिळवून दिली तरी अजूनही मी खैरलांजीच्या आरोपींना फाशीप र्यंत नेऊ शकलो नाही असा अपप्रचार माझ्याविरोधात केला जातो. कोपर्डी खटल्यात आरोपी दलित वर्गातील होती तर मुलगी मराठा समाजातील. सोनई खटल्यात आरोपी मराठा समाजातील आहेत आणि पीडित दलित समाजातील. मी वकील म्हणून गुन्हेगारी घटना म्हणून याकडे पाहातो.
म्हणजे या घटना जातीयवादातून झाल्या नाहीत असे म्हणणे आहे का?
अॅड. निकम : त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार घटना घडते आणि नंतर तिला जातीय रंग दिला जातो हे दुर्दैवी आहे. त्यामुळे जेव्हा निकाल एका वर्गाच्या विरोधात जातो तेव्हा मलाच जातीयवादी ठरविले जाते. त्यामुळे मी यापुढे जातीय रंग असलेले खटले स्वीकारणार नाही असा निश्चय मी अाता केला आहे.
या खटल्यात काेणते आव्हान हाेतेे?
अॅड. निकम : साेनईतील या गाजलेल्या खटल्यातही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणी नाही, मात्र परिस्थितीजन्य पुरावे बळकट आहेत. त्यात पोलिसांनी जप्त केलेली हत्यारे, ५३ साक्षीदारांच्या साक्षी आणि मोबाईलचे लोकेशन्स हा महत्त्वाचा पुरावा ठरला. सचिन आणि दरंदलेंची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते आणि ते लग्न करणार होते हे साक्षींमधून सिद्ध झाले होते. सचिनच्या गळ्यातील दोरा हत्येसाठी वापरण्यात आलेल्या विळ्यात सापडला. मुलीची साक्ष महत्त्वाची होती, परंतु ती न्यायालयीन साक्षी दरम्यान फितूर झाली. मात्र, प्रेमसंबंध सिद्ध करणारे इतरही अनेक दुवे होते. २२ पुराव्यांची साखळी न्यायालयापुढे मांडून आंतरजातीय प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा आमचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला. तीन तपास यंत्रणांमार्फत या खटल्याचा तपास झाला. अहमदनगर ग्रामीण पोलिस, गुन्हे शाखा आणि सीआयडी. या तिन्ही तपासातील धागे दोरे सांधणे हे देखील कसोटीचे काम होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.