आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायमा निवडणुकीत दाेन्ही बाजूूने अाराेप-प्रत्याराेपाच्या झडल्या फैरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (अायमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत अाता खऱ्या अर्थाने रंगत भरलेली पहायला मिळत अाहे. २६ पैकी २५ जागा सत्ताधारी गटाने अविराेध जिंकल्यानंतर मंगळवारी (दि. २९) अध्यक्षपदासाठी निवडणूक हाेत अाहे, ज्यात सत्ताधारी गटाकडून वरूण तलवार यांच्या विराेधात तुषार चव्हाण यांनी दंड थाेपटले   अाहेत. 


उद्या मतदान हाेत असल्याने दाेन्ही उमेदवारांनी रविवारी (दि. २७) वेगवेगळी पत्रकार परिषद घेत एकमेकांच्या विराेधात अाराेप-प्रत्याराेपाच्या फैरी झाडत अापणच विजयी हाेणार असल्याचा दावाही केला. यामुळे अाता नेमका विजय कुणाचा? हयाकडे उद्याेगवर्तुळात चर्चा सुरू झाली अाहे. सहा वर्षापासून प्रत्येक निवडणुकीवेळी 'अायमा हाऊस'चा मुद्दा चर्चेत रहात असून यंदाही हाच मुद्दा केंद्रस्थानी राहीला अाहे. 


निवडणूक लादली : तुषार चव्हाण 
दाेन वेळा अापण अविराेध निवड करायला सहकार्य केले, निवडणुकीतील कटुता टळावी याकरीता प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मात्र यावर्षी काेण इच्छुक अाहे? याची विचारणाही केली गेली नाही. १६ माजी अध्यक्षांच्या बैठकीत मला उपाध्यक्षपद दिले जावे असे ठरले, मात्र तसे लेखी मात्र दिले गेले नाही. काही लाेकांनी मात्र जाणिवपूर्वक सभासदांवर ही निवडणूक लादल्याचा अाराेप अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. अायमा हाऊस तत्कालीन अध्यक्षांनी दिर्घ मुदतीवर व अल्प माेबदल्यात दिलेली हाेती. त्या प्रक्रियेबद्दल तत्कालीन अध्यक्षांबाबत धर्मादाय सहअायुक्तांकडे तक्रार केल्याचा अाकस अाजपर्यंत तत्कालीन अध्यक्षांनी ठेवला असला तरी अामच्या संजय महाजन अाणि कैलास अाहेर यांनी केलेल्या या तक्रारीमुळेच संस्थेला २.६२ काेटीचा नफा मिळाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. अाम्ही तक्रार केल्याचा राग त्यांच्या मनात असल्याचे हिमांशु कनानी यावेळी म्हणाले. चव्हाण यांनी मतपेटीतून सत्ताधारी गटाविरूध्दचा राेष दिसून येईल, असे स्पष्ट केले. तर वरूण तलवार यांचे वय पहाता ते चव्हाण यांच्या वय-अनुभवापुढे ते अध्यक्षपदासाठी खरच पात्र अाहेत का? असा टाेला लगावत घराणेशाही सुरू असल्याचा अाराेप महाजन यांनी केला. मतदार यादीत ६० नावे बाेगस घुसविल्याची तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, कैलास वराडे, बाळासाहेब गुंजाळ, सरदार देवरे, राजेंद्र नागरे, जयंत पवार, नीलेश पवार अादी उपस्थित हाेते. 


न विचारताच नावे टाकली 
तुषार चव्हाण यांच्या जाहीरनाम्यात माजी अध्यक्ष विवेक पाटील यांचे नाव मार्गदर्शक म्हणून टाकण्यात अालेले अाहे, मात्र अापल्याला न विचारताच हे नाव चव्हाण यांनी टाकल्याचा खुलासा विवेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत करत अापण तलवार यांच्यासाेबतच असल्याचे स्पष्ट केले. 


तुम्ही कुठे हाेतात? : वरूण तलवार 
जकातीच्या खासगीकरणाचा मुद्दा असाे, स्टॅगरींग डेचा विषय असाे की घरपट्टीवाढीचा मुद्दा असाे, अाम्ही थेट रस्त्यावर उतरूनही अांदाेलने केली, अामच्या काही नेत्यांवर गुन्हेही दाखल अाहेत. अाम्ही उद्याेजकांसाठी हे सगळे गेली काही वर्ष करीत असतांना तुषार चव्हाण अाणि त्यांची टिम कुठे हाेती? असा सवाल करतांनाच केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना अायमाच्या अध्यक्षपद दिसते, माझे वय किती हे महत्त्वाचे नाही, साेळा वर्षापासून अाम्ही संस्थेसाठी काम करताे अाहाेत, तुम्ही संस्थेकरीता काय याेगदान दिले ते सांगा?, असे खुले अाव्हानच सत्ताधारी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार वरूण तलवार यांनी तुषार चव्हाण यांना पत्रकार परिषदेतून दिले. तर २०१२ ची निवडणूक संस्थेवर चव्हाण यांनी लादली. अायमा इंडेक्सचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. उलट संस्थेच्या या महत्त्वपूर्ण अशा उपक्रमामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांना धमकावण्यात अाल्याचा गंभीर अाराेप माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केला. घाणेरड्या भाषेत मतदारांना मेसेज पाठविले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अायमा हाऊस संदर्भातील दाेन प्रकरणे सुरू असून काेणताही दावा चव्हाणांनी मागे घेतलेला नसल्याचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गाेपाळे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माजी अध्यक्ष विवेक पाटील, जितेंद्र अाहेर, राधाकृष्ण नाइकवाडे, सचिन शर्मा, राजेंद्र पानसरे, गाेविंद झा अादी उपस्थित हाेते. 

बातम्या आणखी आहेत...