आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एेटबाज घाेडा, मुलायम मनीमाऊ अन‌् देखणे पक्षी...; ‘पेट टुगेदर’मध्ये प्राण्यांची भरली शाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- टुकूटुकू चालणारे बदक, ऐटीत उभा रुबाबदार घोडा, देखणे रंगीबेरंगी पक्षी, मुलायम मांजरी अन् छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लळा लावणारे पाळीव श्वान... नाशिक केनिन क्लब, सीएफएआय आणि कॅट फॅसियर्स असोसिएशनतर्फे अायाेजित “पेट टुगेदर-५’मध्ये रविवारी (दि. ७) नाशिककरांचे अाकर्षण ठरले.


ठक्कर डोम येथे आयोजित या शोमध्ये राज्यातून विविध जमातींच्या १८० श्वानांचा प्रमुख सहभाग होता. श्वानांच्या विशेष प्रजाती कोकेशियन शेफर्ड, रफ कॉली, चाऊ चाऊ, न्यू फाऊंडलंड, ग्रे हाऊण्ड, तिबेटियन मस्तिफ यांनी लक्ष वेधून घेतले. देशभरातील सुमारे १५० मांजरी, ज्यात मुख्यत्वे पर्शियन कॅट, बेंगाॅल कॅट, मेन कुन्स, हिमालयन कॅट, एक्झाॅटिक शॉर्ट हेअर कॅट हेदेखील या शाेचे वैशिष्ट्य ठरले. कॅट फॅसियर्स असोसिएशन इंडियाचा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय कॅट शो यावेळी पार पडला.


घोडे पेट शोचे महत्वाचे आकर्षण. त्यात मारवाड, पंजाब, सिंध या भारतीय जमातीच्या घोड्यांचा सहभाग होता. सुमारे २५ घोडे, तीन हेले, खिल्लारी बैल, गीर, लाल सिंधी गाई होत्या. यावेळी लपलेला माणूस ओळखणे, अडथळे पार करणे अशी डॉग ट्रेनिंग, अजिलिटी व डॉग प्रोटेक्शनची  प्रात्यक्षिके दाखवली गेली. पिट बुल, रोटविलर, गोल्डन रिट्रीव्हर, ग्रेट डेन, कॉकर स्पॅनियल, हस्की, तिबेटियन मस्तीफ, फ्रेंच मस्तीफ, अफगाण हाऊन्ट, चिऊव्हाउव्हा हे पॉकेट डॉग, पग यांसारख्या अनेक श्वान प्रजातीही पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर, मकाऊ, बदक, जावा स्पॅरो, कबुतर यासारखे पक्षीही होते. शामेलिओन सरडा, इग्वाना, पंच फेस पर्शियन मांजर, डॉल फेस मांजर अशा मांजरीही होत्या. शोचे परीक्षण हरीश पाटील, अॅलन रेमंड्स, डोग्लस मेअर्स, असद अली जद्दी यांनी केले. पेट टुगेदर कमिटीचे अजिंक्य चोपडे, राहुल चव्हाण, समीर येवलेकर, चित्रेश वासपाते तर नाशिक केनिन क्लबतर्फे पंकज शेवाळे, प्रशांत कुमावत, निखिल पंडित, सुनील धोपावकर उपस्थित होते.

 

बैलांसाेबत मुलांचे सेल्फी..

नव्या पिढीला बैल, रेडा हे प्राणीही जवळून पाहायला मिळणे दुरापास्त झाले अाहे. या शोमध्ये त्यांना पाहून मुलांना अप्रूप वाटू लागले. अनेकांनी या प्राण्यांसोबत सेल्फी काढले.

बातम्या आणखी आहेत...