आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना खबर दिल्याने एकावर प्राणघातक हल्ला; सराईत गुन्हेगारांचे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पोलिसांना खबर देण्याच्या रागातून एका रिक्षा चालकावर प्राणघातक हल्ल्याची घटना शुक्रवारी (दि.८) रात्री इंद्रकुंड येथे उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून एक फरार आहे. 


याप्रकरणी दीपक कापुरे या रिक्षाचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार इंद्रकुंड येथे चहाच्या दुकानासमोर रिक्षा उभी करुन प्रवाशांची वाट पाहात असताना संशयित दीपक चोथवे, प्रवीण लोखंड उर्फ टकल्या, प्रशांत मोरे उर्फ तेलंगी पश्या हे सर्व जवळ आले आणि ‘तु पोलिसांना आमच्याबद्दल खबरी देतो’, अशी कुरापत काढत दोघांनी पकडून ठेवत संशयित चोथवे याने धारधार शस्त्राने वार केले. पुन्हा आमच्या खबर दिल्यास जीवे मारू, अशी धमकीही दिली. 


पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयितांचा शोध घेत लोखंडे चोथवेला अटक केली. मोरे अद्याप फरार आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचवटीतील सराईत गुन्हेगार जेलबाहेर आले असल्याने, गुन्हेगारी घटनांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. याअाधीही पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला हाेण्याच्या घटना घडल्या अाहेत. असे हल्ले राेखण्यासाठी पाेलिसांकडून प्रभावी कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...