आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच महिन्यांत जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गाेळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव / मालेगाव- पाच महिन्यांपासून वनविभागास गुंगारा देणाऱ्या नरभक्षक बिबट्यास शनिवारी रात्री १०.१५ वाजता गाेळ्या घालण्यात अाल्या. सात जणांचे बळी घेणाऱ्या बिबट्यास वरखेडे शिवारात हैदराबाहून अालेला शार्प शूटर नवाब शफहात अलीखान याने ठशांवरून माग काढून अचूक टिपले. त्यामुळे दहशतीखाली वावरणाऱ्या रहिवाशांना माेठा दिलासा मिळाला अाहे. 


चाळीसगाव मालेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने पाच महिन्यात चाळीसगाव परिसरातील जणांचा बळी घेतला हाेता. मालेगाव तालुक्यातील साकूर या गावात एका सहा वर्षाच्या मुलाचा जीवही त्याच्या हल्ल्यात गेला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बाेलून या बिबट्यास दिसताक्षणी गाेळ्या घालण्याचे अादेश देण्यास सांगितले हाेते. 


त्यानंतर त्याच्या शाेधासाठी १० पथके तयार करण्यात अाली हाेती. वनविभागाने १० हजार एकर क्षेत्रात १० मानवी मनाेरे उभारले हाेते.तरी ताे सापडत नव्हता. १० पथकांमध्ये हैदराबादचे नवाब शफहात त्यांचा मुलगा अजगर अली खान, अाैरंगाबादचे डाॅ. साद नक्षबंदी, डाॅ.शाैद नक्षबंदी यांचे पथक हाेते. शनिवारी वरखेडा खुर्द गावात रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये हा बिबट्या दिसला. त्याच्या मागावर हे जणांचे पथक हाेते. त्यांनी त्याला टिपले. 


लोकांवर हल्ला करणार तोच टिपले 
ठारकरण्यापूर्वी हाच तो नरभक्षक बिबट्या आहे का, याची खात्री करण्यासाठी पथकाने काही क्षण वाट पाहिली. रस्त्याने चालणाऱ्या लाेकांवर बिबट्या हल्ला करणार, ताेच त्याला गाेळी घालून ठार केले. काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यात टॅप झालेला बिबट्या हाच होता. 

बातम्या आणखी आहेत...