आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बॉश' चोरी प्रकरण, चौधरी बंधूंसह उद्योजकास न्यायालयीन कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- 'बॉश' चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार छोटू चौधरी, परवेज चौधरी आणि याप्रकरणी नुकतीच अटक करण्यात अालेला लघुउद्योजक अरविंद अग्रवाल या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी (दि. १५) संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात रविवारी अटक करण्यात आलेल्या उद्योजकासह चौधरी बंधूंची पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळत मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. सिन्नर येथील कंपनीतून एक लाखाचे स्पेअरपार्ट हस्तगत करण्यात आले आहेत. 


बॉश चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार छोटू चौधरी आणि परवेज चौधरी बंधूंना अंबड पोलिसांना अटक केली होती. संशयितांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. रविवारी चौधरी बंधूंच्या चौकशी सिन्नर-माळेगाव एमआयडीसी येथील राजाराणी इंडस्ट्रीजचा मालक अरविंद अग्रवाल याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने माळेगाव येथे अग्रवालला अटक केली. तिघांना हजर केले असता तपासी अधिकाऱ्यांनी संशयितांकडून चोरी प्रकरणात पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी फेटाळत तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 


कंपनीच्या पेटंटची खुल्या बाजारात विक्री 
संशयित छोटू चौधरी हा कंपनीतून नोझल, निडल्स, व्हाॅल्व्ह सेट, व्हाॅल्व्ह पीस, व्हाॅल्व्ह पिस्टन आदी कंपनीच्या रिजेक्शन विभागातून स्क्रॅप म्हणून उचलत होते. मात्र, संशयितांनी हे स्पेअरपार्ट पॉलिश करून खुल्या बाजारात विक्री करत कंपनीची फसवणूक केली. हे स्पेअरपार्ट डिझेल वाहनांमध्ये वापरले जातात. बॉश कंपनीमध्येच निर्मित होतात. 

बातम्या आणखी आहेत...