आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसचे ब्रेक फेल, चालकाने टाकला रिव्हर्स गिअर अन‌् वाचले 63 प्रवाशांचे प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळा- खामखेडा येथील मांगबारी घाटाच्या चढावावर एसटीचे ब्रेक अचानक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून एसटी १०० ते १५० फूट मागे अाणत बाभळीच्या झाडावर नेत थांबविली. पुरुष अाणि महिला असे ४८ जण अाणि १५ शालेय विद्यार्थी अशा ६३ प्रवाशांचे प्राण वाचविले. खामखेडा-पिंपळदर मार्गावर गुरुवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. 


सटाणा आगाराची सटाणा-विसापूर बस (एम.एच. २० डी ९०४५) सटाण्याकडे येत असताना मांगबारी घाटमाथ्यावर पाेहाेचल्यावर बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात अाले. पुढे घाटाचा उतार अाणि रस्त्याच्या पूर्व बाजूला ८० ते ९० फूट खोलगट भाग असल्याने त्याने मागच्या वाहनाचा अंदाज घेत सरळ रिव्हर्स गिअर टाकला. पुढे जाणारी बस अचानक मागे का येत आहे, हे प्रवाशांना लक्षात येण्यापूर्वीच चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी बाभळीच्या झाडाला टेकवत बस थांबविली. त्यामुळे माेठा अपघात टळला. काेणालाही जखम झाली नाही. 


घटना सांगतानाही जीवाचा थरकाप 
अापल्यावर नेमका काेणता प्रसंग येणार हाेता, हे समजल्यानंतर प्रवाशांच्या जीवाचा अक्षरश: थरकाप उडाला. सर्वच प्रवासी अाणि प्रत्यक्षदर्शींनी एसटी चालक आत्माराम निकम यांचे कौतुक केले. तुमच्यामुळे बसचा मोठा अपघात टळला, प्रवाशांचे प्राण वाचले असे सांगत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

बातम्या आणखी आहेत...