आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्यांसाठी एमएस सीअायटीची अट रद्द; शासकीय नाेकरीसाठी आवश्यक होती परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतरही शासकीय नाेकरीसाठी संगणकविषयक अतिशय जुजबी प्रश्न विचारणारी एमएस-सीअायटी परीक्षा देणे अनिवार्य हाेते. ही परीक्षा न देणाऱ्यांसाठी शासकीय नाेकरीची कवाडे बंद असायची. त्यामुळे अनेकांना नाेकरीपासून वंचित राहावे लागत हाेते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने अाता शासकीय नाेकरीसाठी एमएस-सीअायटी परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट रद्द केली अाहे.


सरकारने २००३ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, उमेदवारांना शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून २ वर्षांत एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. बऱ्याच काळापासून ही अट रद्द करण्याची मागणी होत होती. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाने यू. व्ही. काेकाटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित केली हाेती. या समितीच्या शिफारशीनुसार शासनाने निर्णय घेतला अाहे. राज्य सरकारने काढलेल्या या नव्या अध्यादेशानुसार, आता इंजिनिअरिंगची पदवी अथवा पदविका घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत कायम होण्यासाठी दोन वर्षांच्या आत एमएस-सीआयटीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. 


यामुळे अट रद्द?
अाजवर संगणक अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच सीअायटीची गरज नव्हती. तथापि, सर्वच अभियांत्रिकी शाखांचा अभ्यासक्रम संगणक अर्हतेसाठी ग्राह्य धरलेला नव्हता. तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त सर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत एमएस-सीअायटी संगणक अभ्यासक्रमाशी निगडित विषय प्रथम वर्षात अभ्यासण्यात येताे. त्यामुळे सर्वच अभियांत्रिकी पदवी व पदविकाधारकांना अाता शासकीय नाेकरीसाठी एमएस-सीअायटी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट रद्द केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...