आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक अामदाराच्या शाळेत गणिताच्या काॅपीचे ‘बीज’; काॅपी पुरवण्यात शिक्षक सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो... - Divya Marathi
सांकेतीक फोटो...

नाशिक- शिक्षक मतदारसंघातील भाजपचे अामदार अपूर्व हिरे यांच्या राेहिले अाश्रमशाळेतच दहावीच्या परीक्षेत शिक्षकांच्या मदतीने काॅपी चालत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. १०) उघडकीस अाला. बीजगणिताच्या पेपरदरम्यान, विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमाेर पुस्तक अाणि गाइड घेऊन काॅपी केल्याचे पुढे अाले अाहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकाराचे एकाने चित्रीकरणही केले अाहे. 


माध्यमिक अाणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या काॅपीमुक्त अभियानाला हरताळ फासण्याचे काम राेहिले येथील अादिवासी सेवा समिती संचलित माताेश्री रेणुकाबाई हिरे प्राथमिक शाळेत घडला. या शाळेत पिंप्री त्र्यंबक अाश्रमशाळा, राेहिले, वेळुंजे, देवरगाव, पिंपळगाव गरुडेश्वर येथील विद्यार्थी परीक्षा देत अाहेत. या शाळेत बीजगणिताच्या पेपरदरम्यान विद्यार्थी पुस्तक अाणि गाइड घेऊन काॅपी करत असल्याचे अाढळून अाले. शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांचा चक्क पेपर लिहून देत असल्याचेही समोर आले.

 

चाैकशी सुुरू; दाेषींवर कठाेर कारवाई
काॅपी प्रकरणाबाबत अद्याप तक्रार प्राप्त नाही. परंतु, तुमच्या सांगण्यावरून मी प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले अाहे. संपूर्ण प्रकरणाची चाैकशी सुरू केली अाहे. त्यासाठी स्वतंत्र समितीही नियुक्त केली अाहे. चाैकशीत दाेषी अाढळल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल. अामची संस्था शिस्तीला अाणि नियमांना मानणारी अाहे. त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यापूर्वीही निमगावमध्ये असा प्रकार घडला हाेता. त्यावेळी तत्कालीन मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात अाले.
- अपूर्व हिरे, समन्वयक, अादिवासी सेवा समिती

बातम्या आणखी आहेत...