आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्याने दिलेले कांदा खरेदीचे 3.5 काेटींचे धनादेश 'बाउन्स'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- मुंगसे उपबाजारात कांदा विक्री केलेल्या दीडशे शेतकऱ्यांना जय भाेले ट्रेडर्सने दिलेले तब्बल साडेतीन काेटी रुपयांचे धनादेश बाउन्स झाले अाहेत. मेहनतीने पिकविलेल्या कांद्याच्या रकमेसाठी दाेन महिन्यांपासून चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांनी हे धनादेश परत येताच गुरुवारी बाजार समितीमध्ये घेराव अाणि ठिय्या अांदाेलन केले. 


मुंगसे येथे परवानाधारक जय भाेले ट्रेडर्सचा मालक शिवाजी सूर्यवंशी याने सुमारे दीडशे शेतकऱ्यांकडून हजाराे क्विंटल कांदा खरेदी केला अाहे. खरेदी केलेल्या मालापाेटी पुढील एक महिन्याचे धनादेश दिले. ते न वटल्याने शेतकरी दाेन महिन्यांपासून पैशासाठी बाजार समितीत चकरा मारत अाहे. गुरुवारी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने महिला व पुरुष शेतकऱ्यांनी बाजार समितीला घेराव घातला. महिलांनी थेट सचिव अशाेक देसले यांच्या दालनाचा ताबा घेत ठिय्या दिला. 


अांदाेलनस्थळी दाखल झालेले छावणी व कॅम्पचे पाेलिस निरीक्षक इंद्रजित विश्वकर्मा व प्रकाश सावकार यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र, अाक्रमक शेतकऱ्यांनी काहीही एेकून न घेता पैशाची मागणी केली. अखेर सभापती राजेंद्र जाधव व उपसभापती सुनील देवरे यांनी ५० लाख रुपयांची रक्कम अाणण्यासाठी कर्मचारी पिंपळगावला गेल्याचे सांगितले. रक्कम प्राप्त हाेताच डिसेंबरपर्यंत रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना मूळ रकमेपैकी अर्धी रक्कम दिली जाईल. यानंतर काही दिवसांत पुन्हा उर्वरित रक्कम देण्याचे नियाेजन करू असे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय मान्य केला. पैशासाठी शेतकरी उशिरापर्यंत बाजार समितीतच बसून हाेते. 

बातम्या आणखी आहेत...