आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवडेत 14 महिन्यांच्या बालकाचा हौदात पडून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- तालुक्यातील शिवडे येथे पाण्याच्या हौदात पडून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २६) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. स्वराज विजय गाडे (वय १४ महिने) असे मयत बालकाचे नाव आहे. हौदात पाण्याचा पंपही सुरू होता, हे पाणी नाकातोंडात गेल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या घटनेने गाडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


विजय गाडे यांची शिवडे येथील शेतात वस्ती असून, सकाळी १० वाजेच्या सुमारास वडिलांसह ते शेतात काम करण्यात व्यस्त होते. तर स्वराजची आई आणि आजी घरकामात मग्न होत्या. याचवेळी नुकताच पाऊल टाकायला लागलेला स्वराज अंगणात खेळत होता. आजी आणि आईची नजर चुकवून तो पाण्याच्या हौदाकडे गेला. तीन फूट उंचीचा हा हौद बांधाच्या एका बाजूने अवघा फूटभर उंच होता. त्याच बाजूने स्वराज हौदात पडला. हौदात पाण्याचा पंपही सुरू होता. त्यामुळे त्याच्या नाका-तोंडात पाणी जाऊन हा चिमुकला गतप्राण झाला. दरम्यान, अंगणात खेळणारा स्वराज नजरेस पडत नसल्याने आई आणि आजीने त्याचा शोध घेतला असता तो पाण्याच्या हौदात मिळून आला. तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, स्वराजच्या अकाली जाण्याने गाडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, शिवडे ग्रामस्थ आणि नातलगांनी त्यांच्या सांंत्वनासाठी गर्दी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...