आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंग पकडताना विजेचा धक्का बसून बालकाचा मृत्यू; फुलेनगरातील जलकुंभाजवळ घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पतंग पकडण्याचा प्रयत्न करत असताना विजेच्या तारेचा धक्का लागून आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (दि. ९) दुपारी वाजेच्या सुमारास फुलेनगर परिसरातील गजानन चौकातील जलकुंभाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोतसिंग भोंड (८, रा. फुलेनगर) हा बालक तुटलेली पतंग पकडण्यासाठी पळत होता. त्याच्या हातात लोखंडी तारेचा आकडा होता. पतंग झाडावर अडकल्याने त्याने आकड्याच्या साह्याने पतंग अाेढण्याचा प्रयत्न केला. झाडावरून उच्च दाबाच्या विजेच्या तारांना आकडा लागल्याने विजेचा तीव्र धक्का या बालकाला बसला. काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार अाला. या बालकास तत्काळ खासगी रुग्णालयात नेले त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फुलेनगर येथील शाळा क्रमांक ५६ मध्ये तो चौथीच्या वर्गात शिकत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नगरसेवक जगदीश पाटील, शांता हिरे यांनी भाेंड कुटुंबीयांचे सांत्वन केले. 


उघड्या तारांचा प्रश्न जैसे थे 
परिसरात उघड्या तारांचा प्रश्न जैसे थे आहे. यापूर्वीही विजेच्या तारांचा धक्का लागल्याने मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. उघड्या तारा भूमिगत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने गांभीर्याने विचार करावा. याकरिता महापालिकेकडून सहकार्य केले जाईल. जेणेकरून दुर्घटना टळल्या जातील. 
- जगदीश पाटील, नगरसेवक, प्रभाग तथा स्थायी समिती सदस्य, मनपा

बातम्या आणखी आहेत...