आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकला व्हीआयपी दर्शन बंद; लवकर दर्शन घेण्‍यासाठी 200 रुपयांची देणगी पावती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर- महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले अाहे. मात्र, ज्यांना लवकर दर्शन घ्यायचे असेल त्यांना २०० रुपयांची देणगी पावती घेऊन ते करता येईल.  

 

ऐनगर्दीच्या काळात व्हीआयपी लोकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे दर्शन रांगेतील भाविकांमधून नेहमीच संताप व्यक्त केला जाताे. त्यावर तोडगा म्हणून ही उपाययोजना केली आहे. या कालावधीत विशिष्ट अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र दाखवून दर्शन घेता येणार नसून त्यासाठी देणगी पावतीच घ्यावी लागणार आहे.  अभिषेकाची पावती करून पुरोहितांसमवेत उत्तर दरवाजाने प्रवेश ठेवण्यात आला आहे.  नेहमीच्या लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी कोठी हाॅलमधून कोणास सोडले जाते यावरच या योजनेचा प्रभाव राहणार असल्याचे बोलले जात आहे.  

बातम्या आणखी आहेत...