आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- नाशिकसह राज्यातील सहा विधानपरिषद मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून (दि. २०) आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवरच आचारसंहिता लागू राहील. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिला.
निवडणूक जाहीर होताच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, नाशिकमधील विधानपरिषदेचे आमदार जयवंत जाधव यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सर्वच सदस्यांचा कार्यकाळ ३१ मेनंतर संपुष्टात येणार असल्याने नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांमधील विधानपरिषद मतदारसंघासाठी २१ मे २०१८ रोजी मतदान घेण्यात येणार असून, आचारसंहिता लागू झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.