आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच मागणाऱ्या टीसीची 155210 हेल्पलाइनवर करा तक्रार; कारवाई शक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रेल्वे प्रवासात लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची अाता खैर नाही. प्रवासात जर कुणी टीसी जादा रकमेची मागणी करीत असेल तर १५५५२१० या हेल्पलाइन क्रमांकावर संबंधितांनी तक्रार करायची अाहे. तक्रारीचे स्वरूप बघून तातडीने या प्रकरणाची चाैकशी अाणि वेळप्रसंगी त्वरित कारवाई करण्यात येणार अाहे. भ्रष्टाचारी रेल्वे कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही याेजना अाणली अाहे.


दरराेज लाखो लोक रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करीत असतात. आशिया खंडात भारतीय रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यास अधिक पसंती देतात. यामध्ये अनेक प्रवासी विनातिकीटदेखील प्रवास करतात. काही प्रवासी घाईगडबडीत तिकीट न काढता प्रवासाला सुरुवात करतात. कधी कधी अनेक प्रवासी जनरल डब्याचे तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर किंवा जनरल डब्याचे तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अंकुश आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वतंत्ररित्या टीटी किंवा टीसी यांची नियुक्ती केली आहे. तिकीट चेकिंग स्क्वाॅडदेखील असतात.  हे कर्मचारी  तिकिटाची रक्कम व दंड अशी रक्कम वसूल करतात. मात्र काहीवेळा तिकीट तपासनीसाकडून जादा रकमेची मागणी केल्याच्या तक्रारी रेल्वे बोर्डाला मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एकूण तिकिटाची रक्कम व दंड यापेक्षा अधिक रक्कम रेल्वे कर्मचारी किंवा टीसी मागत असतील तर प्रवाशांना १५५२१० या हेल्पलाइन क्रमांकावर अाता संपर्क साधता येईल.

 

सविस्तर माहिती दिल्यास कारवाई शक्य
भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण अाणण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक अाहे. प्रवाशांनी भ्रष्टाचाराची घटना काेणत्या तारखेला झाली, रेल्वेचा अाणि बाेगी वा काेचचा क्रमांक काेणता यांची माहिती माेबाइलद्वारे दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही हाेऊ शकते. भ्रष्टाचार घडत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने तेथे पथक पाठवून संबंधितांवर कारवाई करता येईल.
- एस. के. डेव्हिड, मुख्य दक्षता अधिकारी, रेल्वे प्रशासन, मुंबई

बातम्या आणखी आहेत...