आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये दूषित पाणीपुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींच्या पाण्याचे नमुने दूषित येत असतानाही दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी बागलाण, देवळा व निफाडच्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली.

 
जिल्हा पाणी व स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने दरमहा पाणी नमुने गोळा करण्यात येतात. जानेवारी २०१८ च्या अहवालावरून जिल्ह्यातील ९ टक्के पाणी नमुने दूषित अाले अाहेत. यामध्ये बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे, देवळा तालुक्यातील लोहाेणेर व खालप तसेच निफाड तालुक्यातील चांदोरी या चार ग्रामपंचायतीचे पाणी नमुने गेल्या तीन महिन्यापासून दूषित येत आहेत. जानेवारीत तपासण्यात आलेल्या १५०३ नमुन्यांपैकी १४० पाणी नमुने दूषित आल्याने संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींनी पाणी शुद्धीकरणाबाबत वेळीच लक्ष न दिल्यास यास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गिते यांनी सांगितले. 


तीन ग्रामपंचायतींना लाल कार्ड
जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतीना लाल कार्ड देण्यात आले आहेत. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, कळवण तालुक्यातील वडाळा (देवळी कऱ्हाड) व सप्तशंृगगड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...