आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगराेडच्या दुतर्फा सायकल ट्रॅक अाखणीसाठी चाचपणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक शहरात कमी वेळात येण्या-जाण्याच्या दृष्टीने अाणि वाहतूक काेंडी साेडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या जवळपास ४० किलाेमीटर मध्य बाह्य रिंगरोडलगत सायकल ट्रॅक तयार करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या अाहेत. नाशिक सायकलिस्ट असाेसिएशनने त्याबाबत महापालिकेला प्रस्ताव दिला असून, सायकलप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी रिंगरोडवर स्वतंत्र सायकल ट्रॅकची आखणीसाठी चाचपणी सुरू झाली अाहे. 


स्मार्ट सिटीत वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिका क्षेत्रात सायकल चळवळ वेगाने फाेफावत अाहे. महापालिकेच्या अनेक प्रकल्पात सायकल ट्रॅकचा अावर्जून समावेशही हाेत अाहे. सध्या पांडवलेणी येथील बाॅटनिकल गार्डनलगत एक सायकल ट्रॅक अाहे. त्याबराेबरच गाेदावरीच्या तीरालगतही सायकल ट्रॅक प्रस्तावित अाहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या प्रस्तावित स्मार्ट रोडवरही सायकल ट्रॅक तयार केला जाणार अाहे. फॉरेस्ट नर्सरी ते मखमलाबाद गाव कालव्यालगत जिल्हा नियाेजन समितीच्या निधीतून अामदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायकल ट्रॅक विकसित केला जात आहे. अाता सायकलिस्ट असाेसिएशनच्या पुढाकाराने सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या लांबलचक रुंद रिंगराेडलगत सायकल ट्रॅक बनवण्याचा विचार सुरू झाला अाहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेने शहरात सुमारे ४० किलाेमीटर लांंबीचे रिंगरोड विकसित केले आहेत. या रिंगरोडच्या दोन्ही बाजूला किमान पाच फूट रुंदीचा सायकल ट्रॅक तयार केला जाणार अाहे. ही जागा लक्षात यावी यासाठी रिंगरोडवर स्वतंत्र मार्किंग करून त्या जागेवर सायकलीचे चित्र रेखाटले जावे, असा प्रस्तावही सादर केला अाहे. एका किलाेमीटरसाठी एक लाख रुपये खर्च अपेक्षित असून, ४० किमीच्या सायकल ट्रॅकसाठी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित अाहे. 


अाधी १०० मीटरचा सायकल ट्रॅक करून दाखवण्याचे अाव्हान 
त्र्यंबकरोडवरगोल्फ क्लब मैदान ते पिंपळगाव बहुला या दरम्यान पाच किलाेमीटर लांबीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक तयार करण्याचा प्रस्तावही नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचा अाहे. येथे महापालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सायकलची चिन्हे रंगवून अडीच मीटर लांबीचा सायकल ट्रॅक करावा, अशी त्यांची मागणी अाहे. असाेसिएशनला नेमके काय हवे हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वत:च्या खर्चातून १०० मीटर लांबीचा ट्रॅक आधी तयार करून दाखवावा, नंतरच महापालिकेच्या वतीने सायकल ट्रॅकच्या आखणीचा विचार केला जाईल, असे शहर अभियंता यू. बी. पवार यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...