आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या दत्तूने मिळवले दुसरे सुवर्णपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड- पुणे येथील ३६ व्या खुल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये नाशिकचा रोइंगपटू दत्तू भोकनळने रविवारी (दि. १०) ५०० मीटर सिंगल स्कल प्रकारात मिनिट ३२ सेकंदांची आपली सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावून स्पर्धेतील दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २०१८ मध्ये इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असून त्यादृष्टीने सराव सुरू असल्याचे यावेळी दत्तूने सांगितले. 


शुक्रवारी (दि. ८) २००० मीटर सिंगल स्कल प्रकारात मिनिटे सेकंदाचा वेळ नोंदवत त्याने सुवर्ण पटकावले होते. बोटाच्या दुखापतीमुळे सराव झाल्याने दत्तूला २००० मीटरमध्ये स्वत:चेच यापूर्वी असलेले मिनिटे ५४ सेकंदाचे सर्वोत्तम टायमिंग साधता आले नाही. दोन महिन्यांपूर्वी तळेगाव रोही (ता. चांदवड) येथे आपल्या गावी सुटीवर आल्यानंतर शेतीकाम करताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीचे बोट अडकल्याने फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्याला सराव करता आला नाही. 

बातम्या आणखी आहेत...