आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणची नियामक अायाेगाकडे 29,415 काेटींच्या दरवाढीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक अायाेगाकडे मध्यावधी फेेरयाचिका दाखल करून येत्या दाेन वर्षांत दरवाढीद्वारे २९,४१५ काेटी रुपयांची वाढीव महसुलाची मागणी केली अाहे. ही याचिका मान्य झाली तर विजेच्या सध्याच्या दरामध्ये सरासरी एक रुपया ३७ पैसे म्हणजेच २१ टक्के दरवाढ हाेणार अाहे.


शेतीपंपांचे रिडिंग न घेता सरासरी बिले 
मीटर असलेल्या शेतीपंपांचे रिडिंग न घेता सर्रास दरमहा प्रति हाॅर्सपाॅवर १२५ युनिट याप्रमाणे बिलिंग करण्यात अाले. परिणामी कंपनीतर्फे शेतीपंपांचा सरासरी वीजवापर प्रति हाॅर्सपाॅवर १९०० ते २००० तास दाखविला जात अाहे. महावितरणकडून वितरण गळती कमी दाखविण्यासाठी केलेली ही बनवाबनवी 'चाेरी व भ्रष्टाचार' असून त्याचे प्रमाण किमान १२ टक्के व त्याहूनही अधिक अाहे. म्हणजेच वर्षाला ७२०० काेटी रुपयांच्या चाेरी व भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचा अाराेपही हाेगाडे यांनी केला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...