आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार विभागाकडून सुरू असलेल्या कलम ८८ च्या चाैकशीचे दाेषाराेपपत्र अखेर शुक्रवारी निश्चित झाले असून, यात विद्यमान अध्यक्ष केदा अाहेर, माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह १९ संचालकांवर नुकसानीची जबाबदारी चाैकशी अधिकारी नीळकंठ करे यांनी निश्चित केली अाहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण अाणि अामदार अपूर्व हिरे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शिरसाठ यांना मात्र क्लीन चिट दिली गेली अाहे.
सहकार विभागाने बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे पाठवल्याची बाब समाेर आली असताना ८८ च्या कलम ७२(३)नुसार संचालक मंडळावर हे दाेषाराेपपत्र ठेवले गेले अाहे. सीसीटीव्ही खरेदीसाठी निविदा रकमेपेक्षा अधिक खर्च केलेली रक्कम, उच्च न्यायालय व सर्वाेच्च न्यायालयात राज्य शासनाच्या अध्यादेशाविरुद्ध दाद मागण्यासाठी बँकेने केलेला खर्च, बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती अाणि ३०० लिपिक व १०० शिपायांची नियमबाह्य नियुक्ती अशा मुद्द्यांवर करे यांनी ही चाैकशी केली अाहे. यापैकी राज्य शासनाच्या अध्यादेशाविरुद्ध उच्च व सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी केलेला न्यायालयीन खर्च अाणि लिपिक अाणि शिपार्इ यांची भरती या मुद्द्यांत तथ्य अाढळले असून त्यातून बँकेला अाठ काेटी ३६ लाख ४३ हजार ७३९ रुपयांचे नुकसान झाल्याने संबंधितांवर दाेषाराेपपत्र निश्चित करण्यात अाले अाहे.
पुढील स्लाइडवर पाहा, कलम ७२(३) नुसार रक्कम रुपये...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.