आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शह-काटशह टाळण्यासाठी डिनर डिप्लाेमसी, टेंडरचे राजकारण टाळण्यासाठी राजकीय जमवा-जमव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा परिषदेत सदस्यांच्या राजकीय शह-काटशहाच्या राजकारणातून टेंडर रद्द करण्याचा मुद्दा गाजत अाहे. टेंडर केंद्रित राजकारणामुळे सर्वच पदाधिकारी अाणि जिल्हा परिषद सदस्यांचे नुकसान हाेत असल्याने किमान नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, यासाठी पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा डिनर डिप्लाेमसीचे नियाेजन केले जात अाहे. सर्वांना एकत्र अाणण्यासाठी काही पदाधिकारी कामाला लागले असून या अाठवड्यात हा राजकीय मेळा भरण्याची शक्यता अाहे. 


जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाच्या टेंडरसंदर्भात उपाध्यक्ष नंदकिशाेर महाजन यांनी लेखी तक्रार केल्यामुळे समाज कल्याण समितीचे सभापती प्रभाकर साेनवणे अाणि उपाध्यक्ष महाजन यांच्यात मतभेद निर्माण झाले हाेते. तत्पूर्वी सेस फंडाचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना दिल्यानंतर त्यांनी कामांचे असमान वाटप केल्याची तक्रार करण्यात अाली हाेती. नुकताच शिक्षण विभागाच्या बेंच टेंडरला सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी छुपा विराेध केला अाहे. एकंदरीत जिल्हा परिषदेतील राजकारणामुळे टेंडरवरून नुकसान हाेत असल्याचे चित्र अाहे. यातून मार्ग काढण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा डिनर डिप्लाेमसीचा प्रस्ताव ठेवला अाहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या बंगल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित बाेलावून कामांचे नियाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी सर्वांना समान कामांचे अाश्वासन देऊन सर्व संमतीने सर्वसाधारण सभा शांततेत पार पाडण्यात अाली हाेती. परंतु, पुन्हा राजकीय मतभेद झाल्याने टेंडरचे राजकारण पुढे अाले हाेते. गेल्या दीड महिन्यांपासून टेंडरमुळे जिल्हा परिषदेतील राजकारण अंगलट अाल्याने भाजपच्या धास्तावलेल्या पदाधिकाऱ्यांनी डिनर डिप्लाेमेसीचा प्रस्ताव ठेवला अाहे. काही अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पुन्हा हा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पुढे अाली अाहे. 


बेंच खरेदीचे टेंडर वाचवण्यासाठी केले जाताहेत प्रयत्न 
जिल्हा परिषदेतील वाद पुढे येऊ नयेत. टेंडर, कामे वाटपाचे राजकीय भांडवल हाेऊ नये, यासाठी सर्व प्रमुख पदाधिकारी, गटनेते अाणि काही उपद्रवी सदस्यांना विश्वासात घेऊन कामांच्या माध्यमातून न्याय देण्याची याेजना अाहे. सर्वांना एकत्रित बसून हवी ती कामे मार्गी लावून घ्यावीत, सर्वसाधारण, स्थायी समिती अाणि अन्य समित्यांमध्ये सदस्यांना विश्वासात घ्यावे, अशा माेघम अर्टी-शर्ती मान्य करण्याचे धाेरण स्वीकारण्यात अाले अाहे. पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे या राजकीय मेळाव्याचे नियाेजन करण्यात येणार असून त्यासंदर्भात सर्व समित्यांच्या सभापतींशी राजकीय बाेलणी झाली अाहेत. लवकरच याबाबतच सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षण विभागाच्या बेंच खरेदीचे टेंडर वाचवण्याचे प्रयत्न केले जात अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...