आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांपासून रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांचे यंदा वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य शासनातर्फे विविध खेळांतील दिग्गज खेळाडू अाणि संघटकांना दिले जाणारे शिवछत्रपती पुरस्कार यंदा दिले जाणार अाहेत. त्यामुळे २०१४-१५, २०१५-१६ अाणि २०१६-१७ असे तिन्ही वर्षांचे मिळून सुमारे १७५ ते १८० शिवछत्रपती पुरस्कार जानेवारी महिन्याच्या अखेरच्या अाठवड्यात जाहीर करण्यात येणार अाहेत. 


राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाेत्कृष्ट खेळाडू अाणि संघटकांना प्राेत्साहनासाठी दरवर्षी ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देणे अपेक्षित अाहे. गत दीड दशकापासून या पुरस्कारांच्या वितरणात कधीच सातत्य राहिलेले नाही. पुरस्कार खंडित करण्याची परंपरा विद्यमान शासनान कायम ठेवली अाहे. त्यामुळेच विद्यमान शासनाच्या कारकिर्दीतही पुरस्कार जाहीर झाले नव्हते. 


१५वर्षांनंतर पुरस्कार : पुरस्कारांच्यानिकषांमध्ये बुद्धिबळ संघटनेने नियम बदलवणे अावश्यक हाेते. संघटनेने रस दाखवल्याने दीड दशकापासून बुद्धिबळपटूला शिवछत्रपती पुरस्कार मिळू शकला नव्हता. यंदा प्रवीण ठिपसे यांनी याेग्य बदल केल्यामुळेच पुरस्कार मिळण्याचा मार्ग माेकळा झाला.

 
विश्वविजेते अाणि जगज्जेत्याशी विदितची बराेबरी 
गतवर्षीच झालेल्या लढतींमध्ये जगातला अग्रमानांकित मॅग्नस कार्लसनशी त्याने काळ्या साेंगट्यांनी खेळूनही बराेबरी साधली हाेती. पाचवेळचा माजी जगज्जेता अाणि भारताचा अग्रमानांकित विश्वनाथन अानंदलादेखील विदित गुजराथीने डाव बराेबरीत साेडविण्यास भाग पाडले हाेते. 


पुढील पंधरवड्यात हरकती सुनावणी 
२०१४-१५,२०१५-१६ अाणि २०१६-१७ च्या पुरस्कारांसाठी स्क्रुटिनीची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाला गेली अाहे. गुणांकनासह सर्व बाबींची पूर्तता करण्यात अाली अाहे. पुढील अाठवड्यात गुणांकनानुसार यादी जाहीर करून हरकती मागवण्यात येतील. त्यावर सुनावणी हाेऊन महिन्याच्या अखेरच्या अाठवड्यात शिवछत्रपती पुरस्कारांची घाेषणा हाेण्याची शक्यता अाहे. 


विदितला शिवछत्रपती पुरस्कार निश्चित 
नाशिकचा जगविख्यात सुपर ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी याने गत दशकभरात जागतिक बुद्धिबळात निर्माण केलेल्या स्थानाच्या बळावर त्याला यंदा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ मिळण्याचे निश्चित झाले अाहे. बुद्धिबळाच्या विश्वात ताे जागतिक मानांकनात ४१ व्या स्थानावर तर भारतात विश्वनाथन अानंद अाणि पी. हरिकृष्णानंतर तृतीय क्रमांकावर असल्याने पुरस्कार निश्चितपणे जाहीर हाेणार असल्याचे समजते. विदित गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सुपर ग्रॅण्डमास्टर झाला हाेता. त्याअाधी ताे २००९ ला इंटरनॅशनल मास्टर तर २०१३ साली ग्रॅण्डमास्टर झाला हाेता. त्यामुळे निकषानुसार विदितला २००९ किंवा २०१० सालीच शिवछत्रपती पुरस्कार मिळणे अावश्यक हाेते. मात्र, उशिराने का हाेईना, अखेरीस यंदाच्या यादीत त्याचे नाव निश्चित मानले जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...