आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या आता पोलिसांत करता येणार तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामीण पोलिस मुख्यालयात महाराष्ट्र पोलिस सिटिझन पोर्टलच्या इ-तक्रार केंद्राचा शुभारंभ करताना पोलिस अधीक्षक संजय दराडे. - Divya Marathi
ग्रामीण पोलिस मुख्यालयात महाराष्ट्र पोलिस सिटिझन पोर्टलच्या इ-तक्रार केंद्राचा शुभारंभ करताना पोलिस अधीक्षक संजय दराडे.

नाशिक- नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अत्याधुनिक स्वागत कक्ष आणि महाराष्ट्र पोलिस सिटिझन पोर्टल अंतर्गत इ-तक्रार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आता थेट पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत अापल्या तक्रारी पोहाेचवणे शक्य होणार आहे. या पोर्टलवर आलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे या केंद्राच्या वतीने नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. 


नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयात महाराष्ट्र सिटिझन पोर्टल अंतर्गत इ-तक्रार केंद्राचे उद््घाटन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी अपर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक दिलीप पगार, निरीक्षक अशोक करपे, सीसीटीएनएसचे निरीक्षक मांडवकर, श्रीपाद यादव आदी कर्मचारी उपस्थित हाेते. 


ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा 
नागरिकांना याकेंद्राच्या वतीने ऑनलाइन तक्रार करता येणे शक्य होणार आहे. तक्रारदारांचा वेळ आणि पैसा यामुळे वाचणार आहे. तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा. 
-संजय दराडे, पाेलिस अधीक्षक, ग्रामीण 


अशी करा तक्रार 
http://www.nashikruralpolice.gov.inया संकेतस्थळावर जाऊन तक्रार करता येईल. त्यासाठी कम्प्लेंट या टॅबवर क्लिक करून तक्रारीशी निगडीत सर्व सविस्तर माहिती भरावी लागणार आहे. चोरी, घरफोडी, पासपोर्ट, कागदपत्र गहाळ यांसह फौजदारी गुन्ह्यांच्या सर्व तक्रारी करता येतील. 

बातम्या आणखी आहेत...