आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात मुख्यमंत्री मुक्कामी असतानाच शेतकऱ्याची अात्महत्या; वर्षभरात गाठली ‘शंभरी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नैसर्गिक अापत्तींसह कर्ज, नापिकी अन मातीमाेल बाजारभावासह विविध कारणांनी त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वर्षभरात केलेल्या अात्महत्यांनी शुक्रवारी शंभरी गाठली. मालेगाव तालुक्यातील अस्ताणेचे प्रल्हाद नथू अहिरे (६०) यांनी शुक्रवारी विषप्राशन करुन अात्महत्या केली. नाशिकसारख्या सुपीक मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ही अाकडेवारी असल्याने कृषी क्षेत्राचे भयावह वास्तवच त्यानिमित्ताने सामाेरे अाले अाहे. 


तलाठ्याने या अात्महत्येचा पंचनामा करुन त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांसह जिल्हा प्रशासनाकडे शुक्रवारीच रवाना केला. संबंधित शेतकऱ्याच्या नावे सुमारे १.९३ हेक्टर शेती असून त्यावर अस्ताणे विविध कार्यकारी साेसायटीचे लाख रुपयांचे कर्ज हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, सून असा परिवार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घाेषणा करुनही तांत्रिक कारणास्तव ती कर्जमाफी संबंधित सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचू शकलेली नाही. तसेच ही घाेषणादेखील शेतकरी अात्महत्या राेखण्यात कुचकामी ठरत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधाेरेखित झाले अाहे. त्यात मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्राचा दाैरा करीत शुक्रवारी मध्यरात्री नाशिकला मुक्कामी अाले असतानाच शेतकरी अात्महत्येची वार्तादेखील येऊन धडकली. त्यामुळे या अात्महत्यांच्या प्रकरणात शासन, प्रशासन कितपत संवेदनशीलता दाखवते अाणि कर्जमाफीच्या पुढील कार्यवाहीला कशाप्रकारे वेग देते त्याकडे समस्त बळीराजाचे डाेळे लागले अाहेत. 


कर्जमाफीची प्रतीक्षा जीवघेणी
शेतकऱ्यांच्याकर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान याेजना जाहीर करण्याला महिन्यांहून अधिक कालावधी उलटला. मात्र, अद्यापही सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पाेहाेचलेला नसल्याने ही प्रतीक्षादेखील जीवघेणी ठरत असल्याचेच चित्र अाहे. 

 

गतवर्षीपेक्षा वाढ
गतवर्षभरातनाशिक जिल्ह्यातील ८६ शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या हाेत्या. त्यात यंदा कर्जमाफीच्या घाेषणेनंतरही वाढच झाल्याचे वास्तव दिसून येत अाहे. महिनानिहायअात्महत्या : यंदाजानेवारी महिन्यात , फेब्रुवारीत ५, मार्चमध्ये , एप्रिल ११, मे १६ , जून १० , जुलै १४, अाॅगस्ट १३, सप्टेंबर ७, अाॅक्टाेबर , नाेव्हेंबर , डिसेंबरमध्ये (८ तारखेपर्यंत ) अशा अात्महत्या झाल्या. 


तीन वर्षांतील आत्महत्या अशा
> २०१४- ४२ 
> २०१५- ८५
> २०१६- ८७ 


तालुकानिहाय अात्महत्या 
मालेगावमध्येसर्वाधिक १६ तर बागलाणमध्ये १३, त्याशिवाय निफाडमध्ये १२, दिंडाेरी ११, नांदगाव ११, चांदवड १०, कळवण ७, सिन्नर , येवला ६, नाशिक , त्र्यंबकेश्वर ३, देवळा अाणि सुरगाण्यात अशा वर्षभरात शेतकरी अात्महत्या झाल्या. 

बातम्या आणखी आहेत...