आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांवरील कर्जाच्‍या चिंतेतून 16 वर्षीय मुलीने केली आत्‍महत्‍या;नाशिक जिल्‍ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- वडिलांचे अाजारपण, सततची नापिकी व कर्जाच्या अाेझ्याने वैफल्यग्रस्त झालेल्या डाेंगराळे येथील सकूबाई ऊर्फ धनश्री भिकाजी कर्नर (१६) या तरुणीने अात्महत्या केली. महसूल विभागाने दिलेल्या अभिप्रायावरून हे स्पष्ट झाले अाहे. तहसीलदार ज्याेती देवरे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन हा प्रकार शेतकरी अात्महत्येचा असल्याचा अहवाल सादर केला.

 

डाेंगराळे येथे कुटुंबीयांसह वास्तव्य करणाऱ्या भिकाजी कर्नर यांची चार एकर शेती अाहे. शेतात ते कपाशीची लागवड करतात. मात्र, हा भाग दुष्काळी असल्याने नापिकीमुळे त्यांच्यावर सव्वा लाखांचे कर्ज झाले. अशातच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या उपचारावर मोठा खर्च होत आहे. कुटुंबाची हालाकीची परिस्थिती वडिलांचे आजारपण आणि कर्जामुळे धनश्री कर्नर ही वैफल्यग्रस्त झाली होती. या निराशेतून तिने घरी कोणी नसताना 6 जानेवारीला विषारी औषध प्राशन केले होते. धुळे येथे उपचार सुरू आसताना 12 जानेवारीला तिचा मृत्यू झाला.


येथील तलाठ्यांनी अहवाल सादर केल्याने तलसीलदारांनी कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सतीश गावित यांच्यासह पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. पाहणीनंतर हा प्रकार शेतकरी आत्महत्येचा असल्याचा अहवाल दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...