आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाव घसरल्यामुळे टाेमॅटाे शेतकऱ्यांनी दिले फेकून, उत्पादन खर्चही भरून निघणे दुरापास्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठेंगोडा- घाऊक अाणि किरकाेळ बाजारात टाेमॅटाेचे भाव गडगडल्याने व उत्पादन खर्चही भरून निघणे दुरापास्त झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सटाणा-देवळा मार्गावरील सावकी फाट्याजवळ रस्त्यालगत टाेमॅटाे फेकून देत संताप व्यक्त केला. 


पाण्याची टंचाई पाहता व इतर पिके घेण्यापेक्षा हमखास कमाई देईल या अंदाजाने शेतकऱ्यांनी टाेमॅटाेस पसंती दिली. त्यासाठी महागडी रोपे, शेतीची मशागत, महागडे कागद यासाठी खर्च करून घेतलेल्या पिकाला ४० ते ५० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चसुद्धा भरून निघणे मुश्कील झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले असून गेल्या दाेन -तीन दिवसांपासून रस्त्यालगत टाेमॅटाे फेकल्याचे दिसून येत अाहे. 


जनावरेदेखील खाईनात 
सावकी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला फेकलेल्या टाेमॅटाेचा खच दिवसेंदिवस वाढत अाहे. एरवी भाव वधारताच हवाहवासा वाटणारा हा टाेमॅटाे भाव गडगडताच फेकला जात अाहे. कडाक्याच्या उन्हामुळे ताे लगेच खराब हाेत असल्यामुळे जनावरेदेखील त्याला ताेंड लावत नसल्याचे चित्र अाहे.  

बातम्या आणखी आहेत...