आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समृद्धी'च्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही; समृद्धीबाधित शेतकऱ्यांना महसूलमंत्र्यांचे अाश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर- समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला चुकीच्या पद्धतीने देण्यात करण्यात आला अाहे. सुपीक जमिनीस कोरडवाहू दाखवून चुकीच्या पद्धतीने मोजमाप करण्यात आल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर करताच, ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना त्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही महसूलमंत्री पाटील यांनी दिली.महसूलमंत्री यावेळी आमदार अपूर्व हिरे, सुनील बागूल उपस्थित होते. राज्य शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी योजनांचे कार्यालय नाशिकमध्ये व्हावे, अशी मागणी करण्यात आली. 


मराठा आरक्षण व मराठा विद्यार्थी वसतीगृह हा मुद्दा आग्रहीपणे मांडण्यात आला. मराठा क्रांती मोर्चादरम्यान जिल्ह्यातील शेकडो तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले अाहे. ते गुन्हे राज्य सरकारने मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या योजना जाहीर केल्या अाहेत. या योजना सामान्य जनतेपर्यंत योग्यरित्या पोहाेचल्या नसून त्याची नोंद घेऊन योग्यरितीने सादरीकरण करण्याची मागणी केली. यावेळी गणेश कदम, रोशन घाटे, बाळासाहेब लांबे, शिवा तेलंग, नितीन सातपुते, विश्वनाथ वाघ, ज्ञानेश्वर थोरात, तुषार जगताप, राहुल काळे, विजय खर्जूल, नवनाथ शिंदे, अविनाश गायकर, किरण बोरसे, विनायक वाघमारे अादी उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोटखराबा विषयासंदर्भात विविध ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी महिरवणीचे उपसरपंच रमेश खांडबहाले, गिरणारेचे सरपंच तानाजी गायकर, बेळगाव ढगाचे सरपंच दत्तू ढगे उपस्थित होते. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

 
मिरवणुकीसाठी परवानगीसाठी साकडे 
१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार अाहे. जिल्हा शिवजन्मोत्सव समितीतर्फे आमदार अपूर्व हिरे व सुनील बागूल यांनी मिरवणूक परवानगीस अडथळा येत असल्याचे गाऱ्हाणे मांडले. वरिष्ठांशी बोलून परवानगीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. 


वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या करण गायकर यांच्या सातपूर येथील निवासस्थानी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिल्याने भाजपच्या निष्ठावंतांसह कार्यकर्त्यांत तर्कवितर्क लढविले जात अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...