आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी प्रकाश होळकर यांच्या वाङ‌्मय चोरीप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर यांच्या वाङ‌्मय चोरीप्रकरणी एका महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी (दि. २२) सकाळी होळकर यांनी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कॉपीराइट अॅक्ट अधिनियम कायद्यांतर्गत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


होळकर यांचा 'कोरडे नक्षत्र' हा काव्यसंग्रह १९९७ साली प्रकाशित झाला त्यांनी रामदास भटकळ, पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि., मुंबई यांना प्रकाशनाचे अधिकार दिले. त्यांनीच 'कोरडे नक्षत्र' या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये काढली. काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले. दुसऱ्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण २००५ मध्ये झाले. याच काव्यसंग्रहाचे पुन्हा प्रकाशन झाल्याबाबत अनेक साहित्यिकांनी फोन करून माहिती दिली. तसेच हा काव्यसंग्रह एक महिला भेट म्हणून पाठवत असल्याचे समजले. पुस्तकावरील मुद्रकाच्या पत्त्यावर जाऊन माहिती घेतली असता एक महिलेने काव्यसंग्रह पेन ड्राइव्हमध्ये टाइप करून आणल्याचे समजले. होळकर आजारी असल्याचे सांगत प्रती तत्काळ छापून पाहिजे असल्याचे सांगत दाेन हजार प्रती छापून घेतल्या. महिलेने फेब्रुवारी २०१८ मध्ये होळकर आणि या काव्यसंग्रहाचे प्रकाशक पॉप्युलर प्रकाशनची तसेच महिलेच्या आईची परवानगी न घेता १९९७ साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाची नकली प्रत छापून पुस्तकाच्या राज्यातील प्रतिष्ठित लेखक, साहित्यिक, कवी, आणि प्रसारमाध्यमांना पाठवून फसवणूक केल्याची तक्रार होळकर यांनी दिली. सातपूर पोलिस ठाण्यात कॉपीराइट अॅक्ट कायदा उल्लंघन आणि फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक एच. डी. राऊत तपास करत आहेत. 


यापूर्वीही दिला त्रास 
संशयित महिलेने यापूर्वी त्रास दिला आहे. तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. लासलगाव पोलिस, पोलिस आयुक्तांना लेखी तक्रारी दिल्या आहेत. खोट्या तक्रारी करून माझी बदनामी करत आहे. आता काव्यसंग्रहाचे प्रकाशन करून फसवणूक केली आहे. 
- प्रकाश होळकर, कवी 

बातम्या आणखी आहेत...