आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटलतिफांची पगार कपात; अग्निशमन प्रमुखांना गणवेश नसल्याने घरी पाठवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक महापालिका अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी घड्याळाचे काटे बराेबर सकाळच्या दहावर स्थिरावल्यानंतर हजर झालेल्या तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी अधिकारी व कर्मचाऱ्यांना घाम फाेडला. अायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर खातेप्रमुखांच्या बैठकीत उशिराने अालेल्या अधिकाऱ्यांचे वेतन कपात करण्याची तंबी तर दिलीच, मात्र सर्वाधिक वादग्रस्त असलेले व चाैकशी प्रलंबित असलेल्या अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन यांना गणवेश नसल्यामुळे घरी जाण्याची वेळ अाली. गणवेश बदलून अाल्यानंतरच महाजन यांना अायुक्तांच्या बैठकीत सहभागी हाेता अाले.   


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले असून त्याच घाेषणेचा परिणाम म्हणून भाजपला एकहाती सत्ता नाशिककरांनी दिली. मात्र, गेल्या वर्षभराच्या कालावधीत भाजपला चमकदार कामगिरी करता तर अाली नाहीच, मात्र भ्रष्टाचार, गैरप्रकारांमुळे पारदर्शक कारभाराचा डंका पिटणाऱ्या भाजपच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली. नाही म्हटले तरी अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी नाशिकच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावणे सुरूच ठेवले हाेते. मात्र, भाजपच्या अपयशाला झाकण्यासाठी त्यांची बदली करून मुंढे यांना पाचारण केले. शुक्रवारी मुंढे यांनी सकाळी १० वाजता महापालिकेत प्रवेश केला. मुंढे यांनी पालिकेत अाल्यानंतर विभागांची पाहणी केेली. त्यानंतर तडक अायुक्त कार्यालय गाठले. बरोबर १० वाजून १० मिनिटांनी खुर्चीत स्थिरावल्यानंतर सर्व खातेप्रमुखांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपायुक्त फडाेळ यांनी अधिकाऱ्यांना हजर हाेण्याचे अादेश दिले. मात्र, बहुतांश अधिकारी नेहमीप्रमाणे फील्डवर असल्याचे कारण देत दुपारी ११ , १२ वाजता येण्याच्या तयारीत हाेते. मुंढे यांनी काेणासाठी न थांबता थेट बैठक सुरू केली. बैठकीत उशिराने येणाऱ्यांची अाेळखपरेड करत नावे लिहून घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन कपात करा, अशी सूचना उपायुक्त फडाेळ यांना केल्याचे समजते.   


महापालिकेचे यापूर्वीच दाेन्ही अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम व अभिषेक कृष्णा यांनी अनिल महाजन यांच्यावर चाैकशीपासून ते कारवाई करण्यापर्यंत इशारा दिला हाेता. महाजन हे केवळ उद्दाम वर्तणुकीमुळेच नव्हे, तर अग्निशमन दलात हाेणाऱ्या तथाकथित अर्थिक अडवणुकीमुळेही चाैकशीच्या केंद्रस्थानी हाेते. दरम्यान, त्यांना आता नवीन आयुक्त मंुडे यांच्यासोबत काम करावे लागणार आहे.

 

मंुबईप्रमाणे नाशिकमधील अतिक्रमण हेच लक्ष्य
बैठकीत शहराला अतिक्रमणमुक्त करण्याबाबत मुंढे यांचा रस असल्याचे दिसून अाले. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनाही त्यांनी शहरात यापुढे काेणतेही नवीन अतिक्रमण हाेणार नाही यादृष्टीने लक्ष घालण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 

बातम्या आणखी आहेत...